बिहारमधील नालंदा येथे डान्सर तरुणीवर सामूहिक बलात्कार
वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून डान्सर तरुणीसोबत भयंकर कृत्य
मित्रांनीच डान्सर तरुणीचा घात केला
बिहारमध्ये डान्सर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ येथे ही घटना घडली. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये नाचण्यासाठी डान्सर तरुणीला बोलावण्यात आले होते. यावेळी आरोपी मित्रांनी तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेमुळे बिहार हादरले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी ऑर्केस्ट्रामध्ये डान्सर म्हणून काम करते. वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले असून यामध्ये डान्सचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे असे सांगून पीडित तरुणीला तिच्या मित्रांनी बोलावलं. त्यानंतर आरोपींनी पीडित तरुणी आणि तिच्या मैत्रिणीला एका भाड्याच्या खोलीत नेले. त्याठिकाणी आधीच ७ तरुण उपस्थित होते. यामधील दोन तरुणांनी पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.
पोलिसांनी सांगितले की, लहेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही तरुण भााड्याने घर घेऊन राहत होते. ते शिक्षण घेत आहेत. ते ज्या घरात राहतात तिथे घराचा मालक राहत नव्हता. या तरुणांपैकी एकाचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्टी ठेवण्यात आली होती. पार्टीमध्ये डान्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्यासाठी ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करणाऱ्या २ तरुणींना बोलावण्यात आले.
पीडितेने सांगितले की, जेव्हा दोन्ही तरुणी खोलीमध्ये पोहचल्या त्यावेळी तिथे आधीच सात तरुण उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असताना पीडित तरुणीची मैत्रीण तिथून निघून गेली. त्यानंतर दोन तरुणांनी पीडित तरुणीवर जबरदस्ती करत बलात्कार केला. आरोपी आणि पीडिता एकमेकांना ओळखतात. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी पीडित तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या फरार आहेत. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.