Bhiwandi building collapse youth rescued ANI
मुंबई/पुणे

Bhiwandi Building Collapse: धाय मोकलून रडला, हात जोडत आभार मानले! तरुणाची तब्बल २० तासांनंतर ढिगाऱ्याखालून सुटका

Bhiwandi building collapsed: भिवंडी येथे शनिवारी कोसळलेल्या तीन मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बचाव पथकांनी एका तरुणाची तब्बल 20 तासांनी सुटका केली आहे.

Chandrakant Jagtap

Bhiwandi building collapsed: ठाण्यातील भिवंडी येथे 3 मजली इमारत कोसळल्याची घटना शनिवारी घडली होती. या घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेत अजूनही बचावकार्य सुरू आहे. यादरम्यान बचाव पथकाने तब्बल 20 तासांनंतर ढिगाऱ्याखालून एका तरुणाची सुटका केली आहे. तरुणाला मलब्याखालून सुखरुप बाहेर काढतानाचा व्हिडिओ ठाणे महापालिकेने शेअर केला आहे.

सुनील पिसा असं या ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात आलेल्या 38 वर्षीय तरुणाचं नाव आहे. राष्ट्रीय आपत्ती आणि ठाणे आपत्ती दलाने त्यांची सुटका केली आहे. सुटका झाल्यानतंर सुनीलला अश्रु अनावर झाले आणि तो धाय मोकलून रडू लागला. बचाव पथक त्याला उपचारासाठी स्ट्रेचवरून नेताना त्याने दोन्ही हात जोडून आभार मानले आहे. सुनीलाल भिवंडी येथील आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी दिली आहे.

भिवंडी (Bhiwandi) तालुक्यात वळपाडा ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी दुपारी तीन मजली इमारत कोसळली. तिथे गेल्या 22 तासांपासून अग्निशमन दल, पोलीस, टीडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथकाकडून अथक बचावकार्य सुरू आहे. इमरातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या ढिगाऱ्याखाली आणखी 7 पेक्षा जास्त लोक अडकले असण्याची शक्यता आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री अकरा वाजता वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकाच्या कामाची माहिती घेतली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली (building collapse) अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या.

त्याचबरोबर या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार येईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विषारी कफ सिरपमुळे नागपूरमध्ये आणखी एका बाळाचा मृत्यू

Maharashtra Election : निवडणुकीचे पडघम; नगरपालिका, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

Lucky Zodiac Signs: पौर्णिमा तिथीच्या पवित्र योगात या राशी चमकणार! जाणून घ्या आजचं सविस्तर पंचांग आणि शुभ मुहूर्त

Budh Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात आज होणार बुध ग्रहाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

SCROLL FOR NEXT