Bhiwandi News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुर्घटनाग्रस्त इमारतीला भेट, धोकादायक इमारतींबाबत प्रशासनाला दिले निर्देश

Bhiwandi Building collapsed: या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार आहे.
Building collapsed in Bhiwandi
Building collapsed in Bhiwandisaam tv
Published On

>> फय्याज शेख

Building collapsed in Bhiwandi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री अकरा वाजता वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकाच्या कामाची माहिती घेतली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या.

त्याचबरोबर या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासनाकडून केला जाईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Building collapsed in Bhiwandi
DC vs SRH Result: दिल्लीच्या सॉल्टला खड्यासारखा बाजूला केला, तिथंच सामना फिरला, हैदराबादचा विजयी 'अभिषेक' सुरूच

भिवंडीत अनधिकृत व धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न वारंवार समोर येत असतो. त्यातच इमारत दुर्घटना (Building collapsed) घडल्याच्या देखील अनेक घटना भिवंडीत घडल्या असून या दुर्घटना रोखण्यासाठी भिवंडीत क्लस्टर योजना राबविणे गरजेचे आहे असे मत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

भिवंडीतील अतिधोकादायक इमारतींचा लवकरात लवकर सर्वे करून अतिधोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह भिवंडी मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांना यावेळी दिले.

भिवंडीतील क्लस्टर योजना राबविण्यासाठी या योजनेसाठी बाधक असलेल्या जाचक अटीनियमानमध्ये बदल करून, लवकरात लवकर भिवंडीत क्लस्टर योजना राबविण्यात येइल. माणसांच्या जिवापेक्षा दुसरे काही महत्वाचे नाही असे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Building collapsed in Bhiwandi
Horoscope Today : कोणाला आर्थिक लाभ, कोणाला कामात मिळेल यश? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी इमारत दुर्घटना स्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या मजुरांची भेट घेऊन त्यांची चौकशी करून त्यांना धीर दिला.

यावेळी या दुर्घटनेत बचावलेल्या प्रेम आणि प्रिन्स या लहानग्यांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. मुख्यमंत्र्यांची चौकशी करताच लहानग्या प्रिन्सला रडू कोसळले. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याला धीर देत त्यांचे अश्रू पुसले तसेच काळजी करू नकोस असे सांगितले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींवर शासकीय खर्चात उपचार करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

भिवंडी तालुक्यात वळपाडा ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी दुपारी तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत ३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने या दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील वळपाडा येथे ही वर्धमान इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २२ रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com