Jagannath Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Bhiwandi Politics: भिवंडीत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! किसन कथोरेंची पक्षातून हकालपट्टी करा, जगन्नाथ पाटील यांनी फडणवीसांकडे मागणी

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार कपिल पाटील व भाजप आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये अनेकदा खटके उडाले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी या दोघांमध्ये समजुत काढण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यात अलबेल असल्याचे दाखवले जात असले तरी मात्र यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचं चित्र आहे. याचे कारण म्हणजेच निवडणुकीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी किसान कथोरे यांनी समर्थकांमार्फत प्रयत्न केल्याचा आरोप करत किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

या पत्रात जगन्नाथ पाटील यांनी मुरबाड विधानसभेतील आगरी भागात तुतारी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार उमेदवार बाळ्या मामा यांना मतदान करायला सांगितलं. कुणबी भागात शिलाई मशीन म्हणजे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना मतदान करायला कार्यकर्त्यांना सूचना केली. या संदर्भातला माझ्याकडे सर्व पुरावा असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी केलाय.

याबाबत जगन्नाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवत भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी मुरबाडचे भाजपचे किसन कथोरे यांनी समर्थकांमार्फत प्रयत्न केल्याचा आरोप करत किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT