पडदा बाजूला करुन उद्धव ठाकरेंच्या NDAसोबत येण्याच्या थेट हालचाली सुरू, शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा
Uddhav ThackeraySaam Tv

Maharashtra Politics: पडदा बाजूला करुन उद्धव ठाकरेंच्या NDAसोबत येण्याच्या थेट हालचाली सुरू, शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए सोबत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा दावा शिवसेना प्रवक्ता संजय शिरसाट यांनी केला आहे.
Published on

उद्धव ठाकरेंच्या एनडीएसोबत येण्यासाठी हालचाली सुरु असल्याचा मोठा दावा, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. ठाकरे एनडीएबत आल्यास आश्चर्य वाटू नये, असं वक्तव्य त्यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. तर दुसरीकडे दीपक केसरकरांनीही शिरसाटांच्या विधानाला दुजोरा दिलाय. निवडणुकीपूर्वी ठाकेरंनी मोदींशी संपर्क साधला होता, असा दावा त्यांनी केलाय.

काय म्हणाले संजय शिरसाट?

माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले आहेत की, ''ठाकरे यांनी आता हालचाली नाही तर त्यांनी पडदा बाजूला केला आहे. आता ते थेट प्रयत्न करत आहेत. ठाकरे याना आता महाविकास आगाडीत राहायचं नाही, हे जवळपास निश्चित झालं आहे. म्हणून ते पुन्हा एनडीएसोबत आले तर आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.''

पडदा बाजूला करुन उद्धव ठाकरेंच्या NDAसोबत येण्याच्या थेट हालचाली सुरू, शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा
Arvind Kejriwal: 'मी देश वाचवण्यासाठी तुरुंगात जात आहे', अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगात केलं आत्मसमर्पण

शिरसाटांच्या विधानाला दुजोरा देत मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटू इच्छित होते. त्यानी ज्या लोकांकडून हा निरोप दिला, तो निरोप त्यांच्याकडून लपून राहिला नाही. मी जे बोलत आहे, त्याला काही प्रमाण आहे, असं नाही. मात्र हे 100 टक्के खरं आहे की, त्यांनी मोदी यांची भेट मागितली होती. मात्र त्यांना ती मिळाली नाही.

पडदा बाजूला करुन उद्धव ठाकरेंच्या NDAसोबत येण्याच्या थेट हालचाली सुरू, शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा
Bacchu Kadu: अमरावतीत आम्ही जिंकणार, एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही: बच्चू कडू

'उद्धव ठाकरे एनडीएमध्ये सामील होणार'

दरम्यान, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याबरोबर उद्धव ठाकरे एनडीएमध्ये सामील होणार ही, काळ्या दगडावरची पांढरी रेघ असा मोठा दावा आमदार रवी राणा यांनी केलाय. याचबद्दल बोलताना आमदार रवी राणा म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत टीका, ''टिप्पणी केली, ते उद्धव ठाकरे मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर 15 दिवसांत पुन्हा एनडीएमध्ये सामील होणार.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com