EVMपूर्वी पोस्टल मतांची मोजणी करा, इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 Result: मंगळवारी मॅनेजच 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. यातच इंडिया आघाडीने EVMपूर्वी पोस्टल मतांची मोजणी करा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
EVMपूर्वी पोस्टल मतांची मोजणी करा, इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी
India Alliance LaddersSaam Tv

एक मोठी बातमी समोर येत आहे. 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसंदर्भात विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या प्रतिनिधींनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांनी रविवारी मतमोजणीसंदर्भात निवडणूक आयोगाशी चर्चा केली.

ईव्हीएममधील मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वी पोस्टल बॅलेट मतांची मोजणीही पूर्ण करावी, अशी मागणी या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली. कारण पोस्टल बॅलेटमधील मते निवडणूक निकाल पूर्णपणे बदलू शकतात.

EVMपूर्वी पोस्टल मतांची मोजणी करा, इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी
Maharashtra Politics: पडदा बाजूला करुन उद्धव ठाकरेंच्या NDAसोबत येण्याच्या थेट हालचाली सुरू, शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा

यावेळी बोलताना काँग्रेस नेते सीताराम येचुरी म्हणले आहेत की, ''पोस्टल बॅलेट कोणत्याही निवडणुकीत निर्णायक असतात. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आधी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. 2019 मध्ये हे स्पष्टपणे सांगण्यात आले होते की, पोस्टल मतपत्रिकांची मोजणी आधी सुरू होईल आणि नंतर ईव्हीएमची मोजणी होईल. मात्र पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण होईपर्यंत ईव्हीएमची मतमोजणी पूर्ण होऊ शकत नाही.''

EVMपूर्वी पोस्टल मतांची मोजणी करा, इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी
Maharashtra Politics: पडदा बाजूला करुन उद्धव ठाकरेंच्या NDAसोबत येण्याच्या थेट हालचाली सुरू, शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा

दरम्यान, निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वांद्वारे नियम बदलले आहेत, ज्या अंतर्गत त्यांनी 2019 मार्गदर्शक तत्त्वे काढून टाकली आहेत. ज्या अंतर्गत ईव्हीएमच्या अंतिम मोजणीपूर्वी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण करणे बंधनकारक नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com