Bhiwandi Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Bhiwandi Accident News: भिवंडीत २ मजली इमारत कोसळली, २ चिमुकल्यांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती

Bhiwandi Accident: दुमजली इमारत कोसळली असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे. एका बाळासह

Ruchika Jadhav

Bhiwandi Accident:

भिवंडीतून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. येथे एक दुमजली इमारत कोसळली असून यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. एका बाळासह ८ वर्षीय मुलगी यामध्ये दगावली आहे. (Latest Accident News)

अधिक माहिती अशी की, भिवंडी शहरातील गौरीपाडा साहील हॉटेल परिसरात तळमजला अधिक दोन मजली इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत या घटनेत दोन जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे.

ढीगाऱ्याखाली आणखीन काही नागरीक अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलासह ठाणे येथील TDRF चे पथक बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत. शनिवारी रात्री 12:45 वाजता ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

साहिल हॉटेलच्या बाजूला टावरे संकुलनाच्या मागे एक दोन मजली बिल्डिंग पडल्या आहेत असा आम्हाला फोन आला. आतापर्यंत सहा जणांना बाहेर काढण्यात आले आहे. एका छोट्या बाळासह ८ वर्षीय मुलगी या दुर्घटनेत दगावली आहे, अशी माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Farmer : सरकारने जमा केलेली रक्कम शेतकऱ्यांने केली परत; अतिवृष्टीची तुटपुंजी मदत दिल्याने शेतकरी संतप्त

Amruta Khanvilkar Tattoo: अभिनेत्री अमृता खानविलकरच्या हातावर गोंदवलेला खास टॅटू कोणत्या व्यक्तीचा आहे?

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

SCROLL FOR NEXT