मनोज जैस्वाल, प्रतिनिधी...
Washim Bus Accident: वाशिमच्या रिसोड तालुक्यात खासगी बसचा भीषण अपघात झाला. रिसोड तालुक्यातील केनवड जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने चाणक्य ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. यामध्ये १५ प्रवासी जखमी झाले आहेत. मध्यरात्री घडलेल्या या घटनेने एकच गोंधळ उडाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाशिम (Washim) रिसोड तालुक्यात छत्रपती संभाजीनगर - नागपूर जुन्या महामार्गावर खाजगी बसचा अपघात झाला. ही बस पुसद वरून पुण्याकडे (Pune) प्रवास करत होती. यावेळी केनवडजवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली.
या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले. मध्यरात्री झालेल्या या अपघाताने एकच गोंधळ उडाला. काही स्थानिकांनी धाव घेत अपघातातील सर्व जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेने मालेगाव येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.
ठाण्यामधून (Thane) एका दुर्देवी अपघाताची घटना समोर आली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा येथे एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला. या अपघातात निलेश राजपूत या तरुणाचा मृत्यू झाला असून तो मीरारोडचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला, ज्यामध्ये गाडी जळून खाक झाली. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.