Sangli Food Poisoning: शिल्लक अन्न खाऊ घातले... आश्रम शाळेतील १६९ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

Food Poisoning: विद्यार्थ्यांना मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
Sangli News
Sangli NewsSaamtv
Published On

Sangli Food Poisoning In School: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका आश्रम शाळेत १०० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. उमदीमधील आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली असून २० विद्यार्थ्यांना मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. (Sangli News)

Sangli News
Neeraj Chopra News: नीरज चोप्राने 'जग' जिंकलं! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिलाच भारतीय

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील उमदी (Umadi) येथे असणाऱ्या समता आश्रम शाळेतील 100 हून अधिक मुलांना विषबाधा झाली आहे. जत (Jat) तालुक्यातील उमदी गावात एका ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहिलेले जेवण उमदी गावातील समता आश्रम शाळा (Samata Ashram Shala) येथील मुलांना देण्यात आले होते.

त्यानंतर सायंकाळी मुलांना ते जेवण खाल्ल्यानंतर उलट्या आणि मळमळ सुरू झाल्या. सध्या ही सर्व मुलं माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 10 मुलांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Sangli News
Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडकाफडकी गुजरातला रवाना; अमित शहांची घेणार भेट, कारण काय?

शिल्लक अन्न खायला दिल्याने विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण १६९ रुग्ण ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे आले होते. त्यापैकी ७९ रुग्ण सध्या ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे. उर्वरित सर्व रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहेत. (Latest Marathi News)

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com