Pune Accident News: पानशेतजवळ खडकवासला धरणात कार कोसळली; चौघांना वाचवण्यात यश, मुलीचा बुडून मृत्यू

Khadakwasala Dam Accident: भरधाव वेगात असलेली कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली. या दुर्घटनेत एका मुलीचा बुडून मृत्यू झाला.
Pune Accident News car collapse khadakwasla dam girl Death on The Spot
Pune Accident News car collapse khadakwasla dam girl Death on The SpotSaam TV
Published On

Pune Khadakwasala Dam Accident: पुणे जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. पानशेत रस्त्यावरील कुरण फाट्याजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली. या दुर्घटनेत एका मुलीचा बुडून मृत्यू झाला. तर कारमधील चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले. (Latest Marathi News)

Pune Accident News car collapse khadakwasla dam girl Death on The Spot
Mumbai Lake Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांत किती टक्के पाणीसाठा? पाहा आजची ताजी आकडेवारी

थरकाप उडवणारी ही घटना बुधवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह वेल्हे पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. मात्र, मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-पानशेत (Pune News) रस्त्यावरील कुरण फाट्याजवळ भरधाव वेगात असलेली कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली. सायंकाळची वेळ असल्याने वाहनांची वर्दळ होती, तसेच आजूबाजूला स्थानिक नागरिकही होते.

Pune Accident News car collapse khadakwasla dam girl Death on The Spot
Petrol Price Today: क्रूड ऑइलचा भाव आपटला; पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? वाचा आजचा भाव

दरम्यान, कार पाण्यात कोसळल्याचे पाहून स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. नागरिकांनी पाण्यात उड्या घेऊन कारमधील चार ते पाच व्यक्तींना तातडीने बाहेर काढण्यात आले. मात्र, दुर्देवाने कारमधील एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीला बाहेर काढण्यात आलं. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता, डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com