Aditya Pancholi: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यावरील बलात्काराचा गुन्हा रद्द होणार? २ आठवड्यांनी कोर्टात होणार सुनावणी

Aditya Pancholi Case: बॉलिवूड अभिनेता आदित्य पंचोलीने बलात्कार प्रकरणातील FIR रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आतापर्यंत 28 वेळा या प्रकरणात सुनावणी झाली आहे.
Aditya Pancholi Case
Aditya Pancholi CaseSaam Tv
Published On

Aditya Pancholi Case: बॉलिवूड अभिनेता आदित्य पंचोली यांच्याविरोधात दाखल असलेल्या बलात्कार प्रकरणातील एफआयआर रद्द करण्यासाठी त्याने दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात 28व्यांदा सुनावणी पार पडली. हे प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असून, वारंवार तारखा पुढे जात असल्याने या खटल्याकडे संपूर्ण मनोरंजनसृष्टीचे लक्ष लागून आहे.

आज झालेल्या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य पंचोली म्हणाला की, 'हा मामला रद्द होण्याच्या मार्गावर आहे. हा मामला न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे यावर अधिक काही बोलू शकत नाही आणि पुढे काय होईल ते 4 मार्च रोजी समजेल.

Aditya Pancholi Case
Vijay-Rashmika Wedding: पूल पार्टीपासून कॅन्डललाईट डिनरपर्यंत, विजय-रश्मिकाच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचा थाट

या प्रकरणात फिर्यादीकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपांवरून आदित्य पंचोली याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या एफआयआरला आव्हान देत पंचोलीने न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आतापर्यंत तब्बल 28 वेळा सुनावणी झाली असूनही अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रकरण लांबणीवर पडल्याचे चित्र दिसत आहे.

Aditya Pancholi Case
Govinda: गोविंदाला सुनितासोबत लग्नच करायचे नव्हते; 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा, साखरपुडाही मोडलेला, पण...

दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 मार्च रोजी होईल. तोपर्यंत हे प्रकरण प्रलंबित राहणार असून, एफआयआर रद्द होणार की नाही, याबाबतचा निर्णय त्या दिवशी समोर येण्याची शक्यता आहे. या खटल्याचा निकाल काय लागतो, याकडे केवळ बॉलिवूडच नव्हे तर सामान्य जनतेचेही लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com