farmers celebrated bhadrapad bail pola in maval today saam tv
मुंबई/पुणे

Bhadrapad Bail Pola : सखा सोबती असलेल्या बैलांच्या काैतुकात रमले मावळातील शेतकरी, भाद्रपदी बैल पोळा उत्साहात साजरा

Siddharth Latkar

Maval News : भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला (bhadrapada amavasya) साजरा केला जाणारा बैल पाेळा आज (शनिवार) मावळ तालुक्यात माेठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बैल पाेळा निमित्त शेतकरी वर्गात माेठा उत्साह दिसून येत आहे. (Maharashtra News)

धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. प्रत्येक राज्यात हा सण आषाढ, श्रावण, किंवा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला साजरा करतात. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. या सणाचे शेतकरी वर्गात विशेष महत्त्व आहे.

जे बैल वर्षभर शेतात राबतात त्यांच्यासाठी हा एक दिवस आनंदाचा असतो. आज मावळ तालुक्यात विविध घरात आबाल वृद्ध पहाटेपासून बैलाला सजविण्यात व्यस्त हाेते. इंद्रायणी भाताचा अगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पोळा (bail pola) मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे.

ज्यांच्याकडे शेती नाही ते शेतकरी देखील मातीच्या बैलाची पूजा करत आहेत. पहिल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. आज अवतान घ्या उद्या जेवायला या अशी शेतकरी बैलांना निमंत्रण दिल्या जाते. दरम्यान ओढ्यावर किंवा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घातली जात गेली. बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकले गेले.

शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्याच्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालत सुग्रास पुरणपोळीचा नैवद्य दाखवून भंडाऱ्याची उधळण केली गेली. वर्षभरातील निसर्गाच्या लहरिपणाची दुःखे बाजूला ठेवून शेतक-यांना आज बैल पोळा साजरा केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT