Chandrapur Municipal Corporation : कुटुंबाचे भवितव्य बघता संप मागे घ्या; चंद्रपूर मनपा आयुक्त विपिन पालीवालांचे कामगारांना आवाहन

मनपाचे घंटागाडी कामगार सहा ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत.
vipin paliwal, commissioner chandrapur city municipal corporation
vipin paliwal, commissioner chandrapur city municipal corporationsaam tv
Published On

Chandrapur Municipal Corporation : विविध मागण्यांसाठी संपावर गेलेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. कुटुंबाचे भवितव्य बघता कामगारांनी संप मागे घ्यावा असे आवाहन चंद्रपूर मनपाचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी केले आहे. (Maharashtra News)

vipin paliwal, commissioner chandrapur city municipal corporation
Maratha Protest In Kolhapur : छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा : सकल मराठा समाज

जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करणे, ३० मजुरांना पुन्हा कामावर घेणे आणि वेतन चिट्ठी नियमित देणे या मागण्यांचा मुख्यत्व मागण्यांमध्ये समावेश हाेता. यावेळी झालेल्या चर्चेत जुने कंत्राटदार जे वेतन देत होते, त्यानुसार वेतन तत्काळ प्रभावाने लागू करून पुढील काळाकरिता देण्यात येईल.

vipin paliwal, commissioner chandrapur city municipal corporation
Navratri Festival 2023 : नवरात्राेत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज, तुळजापुरसाठी जादा बसचे नियाेजन

जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करून कामगारांना नवीन वेतन देण्यात येईल. जे ३० कामगार कामावरून कमी करण्यात आले होते, त्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात येईल. वेतन चिट्ठी नियमित देण्यात येण्याचे देखील मान्य करून तसे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहे असेही पालीवाल यांनी नमूद केले. 

स्वच्छता सेवा ही अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने शहरातील नागरिकांची भविष्यात कुठलीही गैरसोय होऊ नये यादृष्टीने कामगारांनी संप मागे घेऊन नियमित कचरा संकलन सुरू करावे असे आवाहन मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी केले आहे.

दरम्यान कचरा संकलन आणि वाहतूक या अत्यावश्यक सेवेत कंत्राटी तत्त्वावर काम करणारे मनपाचे घंटागाडी कामगार सहा ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. यामुळे धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सव आणि सणासुदीच्या काळात चंद्रपूर शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. आता महानगरपालिकेने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे संप मिटेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

vipin paliwal, commissioner chandrapur city municipal corporation
Success Story : ट्रकचालकाच्या मुलाची लंडनपर्यंत मजल, वाचा जय चाैधरीच्या जिद्दीची कहाणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com