Maratha Protest In Kolhapur : छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा : सकल मराठा समाज

या तक्रार अर्जवरती पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही सकल मराठा समाजाने केली आहे.
maratha samaj
maratha samajsaam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सकल मराठा समाजाने तक्रार अर्ज दाखल करीत केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्या विरोधात कोल्हापुरात सकल मराठा समाजाने आज (शुक्रवार) आंदाेलन देखील केले. (Maharashtra News)

maratha samaj
Talegaon MIDC : 'देवेंद्र फडणवीसांनी भूमिका बदलल्यास संभाजी छत्रपती आडवा येणार म्हणजे येणार' राजेंचा सरकारला इशारा (पाहा व्हिडिओ)

मराठा आरक्षणासाठी स्वतःचा जीव पणाला लावणाऱ्या जरांगे पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

या निदर्शनानंतर सकल मराठा समाज लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस निरीक्षकाच्या दालनात ठिय्या मांडला होता. यावेळी मंत्री भुजबळ यांच्या विरोधात तक्रार अर्ज देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती वकील प्रवीण इंदुलकर (निमंत्रक सकल मराठा समाज, कोल्हापूर) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

maratha samaj
Pandharpur News : श्रद्धेचा झरा... शेती विकून विठुरायाला 25 तोळ्यांचा सोन्याचा करदोडा, रुक्मिणीस दोन तोळ्याचे मंगळसूत्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com