MHADA Lottery 2024 Saam Digital
मुंबई/पुणे

MHADA Lottery 2024 : म्हाडाची ५३११ घरे कोणाला मिळणार? आज लॉटरीची सोडत; कोणत्या योजनेंतर्गत किती घरे? जाणून घ्या

Sandeep Gawade

MHADA Lottery 2024

म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने ठाणे शहर आणि पालघर, रायगड जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत ५,३११ सदनिका उभारल्या आहेत. त्या कोणाला लागणार, कोण नशिबवान ठरणार याचा निकाल आज लागणार आहे. म्हाडाकडून ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहात संगणकीय सोडत काढली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

सर्वसामान्यांना हक्काची घरे देण्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने नुकतीच जाहिरात काढली होती. त्यानुसार सुमारे ५,३११ सदनिकांसाठी २५ हजार ७८ पात्र नागरिकांचे अर्ज आले होते. त्याची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. त्यासाठी कोंकण मंडळाकडून चोख नियोजन करण्यात आले असून अर्जदारांना सहजपणे निकाल पाहता यावा, म्हणून सभागृहाच्या आवारात एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. तसेच अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसेच म्हाडाच्या अधिकृत फेसबुक पेज, संकेतस्थळावरून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विजेत्यांची यादी सहानंतर

सोडतीतील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी सहानंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच विजेत्या अर्जदारांना ‘एसएमएस’द्वारेही विजेता ठरल्याबाबतच संदेश त्यांनी अर्जासोबत नोंद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तत्काळ प्राप्त होणार आहे.

कोणत्या योजनेंतर्गत किती घरे?

लॉटरीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १,०१० सदनिकांचा समावेश आहे. एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत १,०३७ सदनिका, सर्वसमावेशक योजनेंतर्गत ९१९ सदनिका, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ सदनिका आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेंतर्गत २,२७८ सदनिका आहेत. इतरही योजनांतर्गत सुमारे ३,०३३ सदनिकांच्या वितरणासाठी सोडत काढली जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: 'डरपोक शिंदे सरकार, निवडणुका घेण्याची हिम्मत नाही', संजय राऊतांनी तोफ डागली; 'वन नेशन, वन इलेक्शन'वरुनही टीका

Maval News : शरद पवारांच्या पक्षाला भाजपचा पाठिंबा? अजितदादांच्या आमदाराचा गंभीर आरोप

Maharashtra News Live Updates : धनगर आंदोलनाचे पडसाद, पुणे- इंदापूर महामार्ग रोखला

Train Cancelled: पुण्यातून धावणाऱ्या तब्बल १० रेल्वेगाड्या रद्द; अनेकांचे मार्ग बदलले; कारण काय?

Mahalakshmi Yog: ३ दिवसांनी बनणार पॉवरफुल महालक्ष्मी योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

SCROLL FOR NEXT