Badlapur To Panvel Tunnel:  Saamtv
मुंबई/पुणे

Vadodara JNPT Highway: बदलापूर ते पनवेल प्रवास फक्त १५ मिनिटात, बडोदा जेएनपीटी महामार्गातील बोगद्याचे काम पूर्ण; वाचा सविस्तर..

Badlapur To Panvel Tunnel: बडोदा जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू आहे. बदलापूर ते पनवेल बोगदा हा या महामार्गातला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.

अजय दुधाणे

बदलापूर, ता. ५ सप्टेंबर २०२४

JNPT Highway Badlapur Tunnel: बडोदा जेएनपीटी महामार्गावर बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्याचे काम अवघ्या 15 महिन्यांत पूर्ण करण्यात आलं असून यामुळे बदलापूर आणि नवी मुंबईला एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सध्या बोगद्यांच्या आतमध्ये प्लॅस्टरिंगचं काम सुरू असून त्यानंतर रस्ते आणि अन्य कामं केली जाणार आहेत.

महाराष्ट्रात सर्वात मोठा बोगदा!

बडोदा जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू आहे. बदलापूर ते पनवेल बोगदा हा या महामार्गातला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी बदलापूरहून तब्बल सव्वाचार किलोमीटर लांबीचा बोगदा पनवेलपर्यंत तयार करण्यात आला आहे. हा बोगदा 22 मीटर रुंद असून त्यात चार मार्गिका असणार आहेत. या बोगद्याला आतमध्ये काही ठिकाणी इंटरचेंज सुद्धा देण्यात आले आहेत. या बोगद्याच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवघ्या 15 महिन्यातच बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे.

चार जिल्ह्यात येणार समृद्धी!

सध्या बोगद्यांच्या आतमध्ये प्लॅस्टरिंगचं काम सुरू असून त्यानंतर रस्ते आणि अन्य कामं केली जाणार आहेत. या महामार्गावरून जेएनपीटी बंदराकडे मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सुद्धा होणार असून त्यामुळे बदलापूर आणि आसपासच्या पट्ट्यात या महामार्गाला लागून कमर्शियल हब आणि गोदामं सुद्धा उभे राहू शकणार असून त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे बडोदा जेएनपीटी महामार्ग ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने समृद्धी आणणार आहे.

नितीन गडकरींनी केलं कौतुक

या महामार्गावरील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या बोगद्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी बोगद्याची पाहणी करून कामगारांचं कौतुक केले. हा महामार्ग सुरू झाल्यानंतर या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे. तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या 30 ते 40 मिनिटात करता येणार आहे. नवी मुंबई विमानतळाला सुद्धा या महामार्गामुळे मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दरम्यान, हे काम विहित मुदतीपेक्षा आधीच पूर्णत्वाला आल्यानं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही कौतुक केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मविआमध्ये ड्रायव्हर सीटसाठी वाद - मोदी

Onion Price : कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; लासलगाव बाजार समितीत कांद्याला उच्चांकी दर

Home Remedies: 'या' घरगुती उपायांनी सर्दी होईल छुमंतर

Fashion Tips: नववधूने स्वत:च्या वॅार्डरोबमध्ये नक्की ठेवावे 'हे' कपडे

Gold Price Today : सोन्याचा कहर! पुन्हा वाढला सोन्याचा भाव; पाहा एक ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT