Badlapur Panvel Highway: बदलापूर ते पनवेलपर्यंतचा प्रवास अवघ्या २० मिनिटांत; बोगद्याचं काम ५० टक्के पूर्ण

Badlapur panvel highway tunnel: कनेक्टिव्हिटीसाठी गेल्या वर्षापासूनच डोंगरातून जवळपास सव्वा चार किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
Badlapur Panvel Highway
Badlapur Panvel HighwaySaam TV
Published On

Badlapur:

गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूरकर वडोदरा जेएनपीटी प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. या प्रकल्पामुळे बदलापूर ते पनवेल अंतर कापण्यासाठी एक बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्यामुळे बदलापुरहून नवी मुंबईला अवघ्या २० मिनिटांत जाता येणारे. त्यासाठी गेल्या वर्षापासून बोगद्याचे काम सुरू आहे . हे काम आता ५० टक्के पूर्ण झालंय. उर्वरित काम देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Badlapur Panvel Highway
Badlapur Breaking News: बदलापूर खरवई MIDC कंपनीत भीषण स्फोट; १० ते १२ किलोमीटरपर्यंत परिसर हादरला; भयानक VIDEO

मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी या बोगद्याच्या कामाची पाहाणी वडोदरा जेएनपीटी प्रकल्पाचे अधिकारी वर्ग तसेच स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी केली. पुढील वर्षात म्हणजे २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.

बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर बदलापूर शहर सगळ्याच मोठ्या शहरांशी जोडले जाणार आहे. जुलै २०२५ पर्यंत या संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

वडोदरा ते जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. हा महामार्ग १८९ किमी लांब आणि १२० मीटर रुंद असून आठ पदरी बांधण्यात येत आहे. बदलापूर शहरातील बेंडशीळ या गावातून हा महामार्ग जातोय. त्यामुळे बदलापूरला वडोदरा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

वडोदरा आणि जेएनपीटी महामार्ग कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या बेंडशीळ गावातून जातो. कनेक्टिव्हिटीसाठी गेल्या वर्षापासूनच डोंगरातून जवळपास सव्वा चार किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

या महामार्गामुळे बदलापूर शहराचा आणखी विकास होणार आहे. बदलापूर शहर नवी मुंबई, मुंबई, पालघर, गुजरात, नाशिक, नागपूर, दिल्ली या प्रमुख शहरांना जोडले जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे बदलापूर ते पनवेल हे अंतक केवळ वीस मिनिटात कापता येणार आहे. तसेच मुंबईमध्ये अवघ्या ४० मिनिटांत पोहोचता येणार आहे.

Badlapur Panvel Highway
Mumbai News: धक्कादायक! लिव्ह इन पार्टनरच्या अत्याचाराला कंटाळून तरूणीने संपवलं जीवन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com