Nitin Gadkari: जीवन विमा प्रीमियमवरील GST रद्द करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं स्वतः च्याच सरकारला पत्र

Nitin Gadkari Letter To Nirmala Sitaraman: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्र लिहून आयुर्विमा आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी कर रद्द करण्याची मागणी केली आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSaam Tv
Published On

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी निर्मला सितारामन यांना पत्र लिहून आयुर्विमा आणि आरोग्य विमा प्रिमियमवरील (Life Insurance and Health Insurance)१८ टक्के जीएसटी मागे घेण्याची मागणी केली आहे. आरोग्य विमा आणि आयुर्विमावर सध्या १८ टक्के जीएसची लादला जात आहे. हाच जीएसटी कर न लावण्याची मागणी नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी केली आहे.

Nitin Gadkari
Mukhyamantri Annapurna Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींना मिळणार 3 मोफत सिलिंडर; काय आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अटी, जाणून घ्या...

नितीन गडकरी यांनी पत्रात म्हटले की, 'जीएसटी कर हा आयुर्विमावर लादण्यासारखा नाही.त्यामुळे या क्षेत्राची वाढ थांबेल.जीवन आणि आरोग्य विम्यारील प्रीमियमवरील जीएसटी कर मागे घेण्याच्या मागणीचा प्राधान्याने विचार करावा. ज्येष्ठ नागरिकांना हा कर भरणे अशक्य आहे.. आरोग्य विमा प्रिमियमवरील १८ टक्के जीएसटी या विभागाच्या वाढीसाठी योग्य नाही. यामुळे या विभागाची वाढ होत नाही. जीवन विम्यावरील प्रीमियमवर जीएसटी लादणे म्हणजे जीवनाच्या अनिश्चितेवर कर लादण्यासारखे आहे. युनियनचे असे मत आहे की, जी व्यक्ती कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी आयुर्विमा खरेदी करते. त्या खरेदीच्या प्रीमियमवर कर आकारला जाऊ नये. जीवन आणि आरोग्य विमा प्रीमियमलरील जीएसटी मागे घेण्याच्या सूचनेचा विचार करावा',असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

Nitin Gadkari
Lakhpati Didi Scheme: महिलांना व्यवसायासाठी मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय?

यापूर्वीही झाली होती मागणी

या वर्षी जून महिन्यात कॉन्फेडरेशन ऑफ जनरल इन्शुरन्स एजंट असोसिएशन ऑफ इंडियाने आरोग्य विम्यावरील जीएसटी (GST) कमी करण्याची मागणी केली होती. १८ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांपर्यंत हा कर कमी करण्याचे आवाहन सरकारला केले होते. त्यानंतर आता पुन्हा नितीन गडकरी यांनी आरोग्य आणि आयुर्विमावरील जीएसटी कर रद्द करण्याची मागणी केली.

Nitin Gadkari
Loan Scheme for Disabled Persons: दिव्यांग नागरिकांसाठीची कर्ज मर्यादा ५० हजारांवरून अडीच लाख करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com