Political heat rises in Baramati as Laxman Hake signals a direct contest against Sunetra Pawar in the upcoming by-election Saam Tv
मुंबई/पुणे

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाही; सुनेत्रा पवारांच्या विरोधात बडा नेता रिंगणात उतरणार

Baramati By-Election 2026 Candidates List: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याने राजकीय रंगत वाढली आहे.

Omkar Sonawane

मंगेश कचरे, साम टीव्ही

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानंतर राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाली असून 23 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार का? यावर आता शंका उपस्थित होत आहे. राहुरीमध्ये देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. बारामतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले असून सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट बारामती निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

यावेळी हाके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विधानसभा मतदारसंघांमध्ये बारामती विधानसभा पोट निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ही पोटनिवडणूक लढली पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर मी बारामतीकरांच्या भेटी घेत आहे. पुढील चार-पाच दिवस मी नागरिकांच्या भेटीसाठी येणार आहे. विधानसभा मतदारसंघांमध्ये बारामती विधानसभा पोट निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली आहे.

कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ही पोटनिवडणूक लढली पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर मी बारामतीकरांच्या भेटी घेत आहे. पुढील चार-पाच दिवस मी नागरिकांच्या भेटीसाठी येणार आहे. निवडणूक लढली पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. निवडणूक बिनविरोध करणं हे लोकशाही विरोधी कृती आहे. जर अजितदादांच्या अपघाती निधनाबद्दल एवढं दुःख असेल तर सुनेत्रा पवारांना तुम्ही बिनविरोध विधान परिषदेवर घ्या असे ही लक्ष्मण हाके म्हणाले.

28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. ज्यामध्ये त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा सुरू असताना आता मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. लक्ष्मण हाके पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? की बिनविरोध होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT