Sunetra pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

Baramati By Poll Result: सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय, अजितदादांचा बारामतीमधील रेकॉर्ड मोडला; किती मतं मिळाली?

Sunetra Pawar Wins Baramati By Poll: बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय झाला आहे. सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांचे आभार मानले. त्यांनी विजयी मिरवणुका काढू नका असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

Priya More

Summary -

  • सुनेत्रा पवारांचा बारामतीत विक्रमी विजय

  • २.१४ लाख मतांसह ऐतिहासिक कामगिरी

  • त्यांनी अजित पवारांचा २०१९ चा रेकॉर्ड मोडला

अक्षय बडवे, पुणे

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पार पडलेल्या पोट निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय झाला. सुनेत्रा पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील अजित पवार यांचा रेकॉर्ड मोडला. सुनेत्रा पवार यांना एकूण २३ फेऱ्यांच्या अंती २ लाख १४ हजार ५९ मतं मिळाली. सुनेत्रा पवार यांच्या विजयामुळे बारामतीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुनेत्रा पवार यांचा विजय जरी झाला असला तरी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विजयी मिरवणुका काढू नका असे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देशात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या आमदार ठरल्या आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना २ लाख १८ हजार ९३० मतांची आघाडी मिळाली. सुनेत्रा पवार यांनी उत्तर प्रदेशातील आमदार सुनील शर्मा यांचा विक्रम मोडला. तर सुनील शर्मा यांना २०२२ मध्ये २ लाख १४ हजार ८३५ मतं मिळाली. सुनेत्रा पवार यांनी २०१९ मध्ये अजित पवार यांचा देखील रेकॉर्ड मोडला आहे.

सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विजयी मिरवणुका आणि गुलालाची उधळण करू नका, असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे विजयानंतरही बारामतीमध्ये जल्लोष केला जाणार नाही. सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, 'आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावुक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया.'

सुनेत्रा पवार यांना फेरी निहाय प्राप्त झालेली मतं -

फेरी १. 8868

फेरी २. 7675

फेरी ३. 10230

फेरी ४: 9604

फेरी ५: 8419

फेरी ६ : 8682

फेरी ७ : 8439

फेरी ८: 8725

फेरी ९: 7886

फेरी १०: 9300

फेरी ११: 7924

फेरी १२: 8057

फेरी १३: 8559

फेरी १४: 9587

फेरी १५: 11061

फेरी १६: 8993

फेरी १७: 9161

फेरी १८: 8190

फेरी १९: 9489

फेरी २०: 11065

फेरी २१: 10037

फेरी २२: 8975

फेरी २३: 11086

फेरी २४: 9212

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari Photos: दोन मुलांची आई श्वेता तिवारीचं पंचेचाळीशीतलं सौंदर्य, तरूणांनाही लाजवेल असं

Baramati By-Election: सुनेत्रा पवारांचा भीम पराक्रम; देशात राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम

Shocking : भरमंडपात रक्ताचा सडा, मेहुणीच्या लग्नात भाऊजीची हत्या, साडूनेच केला घात

Baramati rahuri bypolls election results: सुनेत्रा पवार यांच्या नावे विक्रम, देशात आणि राज्यात सर्वाधिक मताधिक्य

Election Result Live : तामिळनाडूमध्ये थलपतीच्या ड्रायव्हरचा मुलगा आघाडीवर

SCROLL FOR NEXT