Pune Bus Accident : Saam tv
मुंबई/पुणे

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

Pune Bus Accident News : बदलापूरहून पर्यटकांना घेऊन तोरणा किल्ल्याकडे निघालेल्या बसचा अपघात झाला आहे. ही बस १०० फूट खोल दरीत कोसळली आहे.

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : पुण्यातील किल्ले तोरणाकडे जाणाऱ्या पर्यटकांची मिनी बस शंभर फुटाहून अधिक दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी झालेल्या या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या बसमध्ये बदलापुरातील देखील प्रवासी होती.

तोरणा किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची बस शंभर फुटाहून अधिक दरीत कोसळली. मात्र, ही मिनी बस झाडाला अडकल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात निलेश प्रताप कदम (५०), संजय मधुकर पाटील (४९) दोघेही किरकोळ जखमी झाले. हे दोघेही बदलापुरातील राहणारे आहेत. बसमधील इतर पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिनी ट्रॅव्हलमधील त्यांची सहकारी सुरेंद्र मरळ यांनी दिली.

या प्रकरणी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या जखमी पर्यटकांवर वेल्हे ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार केले असल्याची माहिती येथील डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, या मिनी बसमध्ये बदलापुरातील पंचवीस पर्यटक हे किल्ले तोरणा गडावर बसने जात होते. यावेळी पार्किंगच्या अलीकडे असलेल्या मोठ्या वळणावरती बस चालकाचा ताबा सुटल्याने चढावरून मागे घेताना रस्त्याच्या कडेवरून खाली खोल दरीत 100 फुटावून अधिक कोसळली. मात्र, मिनी बस ही मागे जात असताना झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT