Badlapur School Girl Incident:  Saamtv
मुंबई/पुणे

Badlapur Case: बदलापूर अत्याचाराची घटना कशी उघडकीस आली? आतापर्यंत काय घडलं? वाचा

Namdeo Kumbhar

Badlapur School Crime Case: बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार (Badlapur Minor Student Assault) झाल्याची घटना घडली अन् अख्खी मुंबई हादरली. एकीकडे कोलकातामध्ये झालेल्या घटनेनं देशात पडसाद उमटले असतानाच बदलापूर घटनेने (Badlapur School Students Molestation Case)ही सर्वांना हादरवले.

राज्य सरकारने या घटनेची दखल घेत एसआयटी स्थापन केली, त्याशिवाय आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले. मागील सात तासांपासून बदलापूरमध्ये लोकांचे आंदोलन सुरु आहे. आरोपीला फाशी द्या, आशी संतप्त मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

नराधमानं अगदी कोवळ्या जीवांना ओरबाडलं (Badlapur rape case), अजाणत्या वयातच दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे बदलापूरकर (Badlapur School Students Molestation Case) रस्त्यावर उतरलाय. बदलापूरमधील घटनेमुळे प्रत्येकजण हळहळला आणि चिमुरड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला.

रेल्वे, लोकल बंद झाल्या आहेत. आज बदलापूरमध्ये बंद पाळण्यात आलाय. बदलापूरकरांनी प्रशासनाला धारेवर धरलं. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या क्रूर नराधमाला फासावर लटकवा असा एकच सूर लावून धरला. आंदोलकांना (badlapur protest today) शांत करण्यासाठी राज्य सरकारकडून गिरीश महाजन आले होते, पण त्यांच्यासमोरच आंदोलनकर्त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या, असा सूर धरला. लोकांचा संताप आणि रोष अतिशय तीव्र आहे.

'त्या' दिवशी नेमकं घडलं काय?

बदलापूर पूर्वेतील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत शिशु वर्गात शिकणाऱ्या चार वर्षांच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात होत्या. शाळेतीलच एका सफाई कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. १३ ऑगस्ट रोजी धक्कादायक घटना घडली. अजाणत्या वयातच भोगाव्या लागलेल्या वेदनेमुळे मुलीच्या मनालाह ठेच पोहचली. शाळेत जाण्यास घाबरत होती.

नात शाळेत का जात नाही, त्यामुळे आजोबांनी वैद्यकीय तपासणी केली. रिपोर्ट्स हातात पडल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली. फक्त आपल्या मुलीसोबतच नाही तर आणखी एका मुलीसोबत असा प्रसंग घडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. दोन्ही कुटुंबियांनी याप्रकरणानंतर शाळेत जाब तर विचारलाच पण पोलिसांतही धाव घेतली. पण गुन्ह्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांकडूनही त्यांना वेठीस धरण्यात आले. १२ तास पोलिसांनी गुन्हाच नोंदवला नाही.

पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला -

१६ ऑगस्ट रोजी दोन्ही कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठले. दुपारी १२ वाजण्याच्या आसपास कुटुंबिय पोलिसांत तक्रार देण्यासाठी दाखल झाले. पण पोलिसांनी एफआयआर नोंदवलाच नाही. अखेर याप्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर रात्री एक वाजल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त होतोय.

ज्या शाळेत हा प्रकार घडला, ती शाळा बदलापूरमधील अतिशय जुनी, नामांकित आणि सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे बदलापूर शहरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जातेय. त्यासाठी बदलापूरकर रस्त्यावर, पटरीवर उतरले आहेत.

आरोपीला बेड्या -

नागरिकांचा तीव्र संताप पाहिल्यानंतर प्रशासनालाही जाग आली. पोलीस तात्काळ कामाला लागले. पोलिसांनी प्रकरणाचा प्रमुख आरोपी अक्षय शिंदे (वय, २४) याला बेड्या ठोकल्या. अक्षय शिंदे त्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. त्याच्यावर याआधीही पोलिसात आशाच प्रकारची तक्रार झाली होती, तरीही त्याला शाळेनं पुन्हा कामावर का घेतलं? त्याची पडताळणी केली नाही का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

पोलिसांवरही कारवाई -

लोकांचा रोष पाहता प्रशासनाने कठोर कारवाई सुरु केली. तक्रार नोंदवण्यास विलंब केल्याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून शाळेलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. यासाठी एक समितीही नेमण्यात आली आहे. त्याशिवाय शाळेचे मुख्याध्यापिकेचे आणि मुलींची देखभाल करत आलेल्या दोन सेविकांचेही निलंबन केले आहे.

बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार

बदलापूर अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विद्यार्थिनीना थोडा जरा संशय आल्यास त्यांना तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक, किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आलं पाहिजे अशी यंत्रणा हवी असे मुख्यमंत्री म्हणाले.

बदलापूर प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भाचे आदेश दिले आहेत. बदलापूर प्रकरणानंतर विरोधकांनीही आपली भूमिका मांडत आरोपीला तातडीने शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT