बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आला असून पोलिसांना १२ तास गुन्हा नोंद केला नव्हता. त्यावरून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बदलापूरकरांनी रेल्वे स्थानकावर गेल्या पात तासांपासून उग्र आंदोलन छेडल आहे. जोपर्यंत त्या नराधमाला शिक्षा होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार आंदोलकांनी केला. दरम्यान या आंदोलनावर आणि प्रकरणावर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
''बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, मग पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या, असं आवाहन त्यांनी मनसैनिकांना केलं आहे.
बदलापूर पूर्व भागातील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या २ चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या दोन्ही चिमुकल्या मुली लघुशंकेसाठी गेल्या असताना शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच त्यांच्यावर अत्याचार केले होते. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी सलग दोन दिवस ही घटना घडली होती. पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नव्हतं. त्यामुळे तिच्या आजोबांनी तिला डॉक्टरकडे नेवून वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलं. यातून दुसऱ्या मुलीवरही अत्याचार झालंचं उघड झालं.
यानंतर कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात धाव घेतली, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. या प्रकरणात नससेच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला होता. त्यानंतर तक्रार दाखल करून घेण्यात आली होती. तब्बल १२ तासांनंतर तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांना त्या नराधमाला अटक केली, मात्र त्यांच नाव गुप्त ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे बदलापूरकरांनी आणि मनसेने आज आंदोलनाचा इशारा दिला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.