Badlapur Railway Station : Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Railway Station : बदलापूर होम प्लॅटफॉर्म उद्घाटनाचा वाद वाढला; विरोध कुणाचा?

अजय दुधाणे

Badlapur railway Station News Update :

बदलापूर होम प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. बदलापूर होम प्लॅटफॉर्म उद्घाटनाच्या कार्यक्रमाविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. बदलापूर रेल्वे स्टेशनच्या होम प्लॅटफॉर्मचं काम अर्धवट अवस्थेत आहे. याचदरम्यान घाईघाईत उद्घाटन करण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडून सुरु असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी अर्धवट अवस्थेतील होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केल्यास काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचा पवित्रा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. (Latest Marathi News)

बदलापूर रेल्वे प्लॅटफॉर्मवर होम प्लॅटफॉर्मवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बदलापूरकर गेल्या काही महिन्यांपासून या होम प्लॅटफॉर्म पूर्ण होण्याची वाट पाहत होते. यामुळे साऱ्यांचं लक्ष या होम प्लॅटफॉर्मच्या कामाकडे लागलं होतं. लवकरच या होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण होणार आहे. मात्र , या प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण होण्याआधीच महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये राजकारण पेटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाविकास आघाडीचा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोध

बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील यांच्याकडून करण्यात येणार आहे. मात्र, बदलापूरच्या या होम प्लॅटफॉर्मचं काम अर्धवट अवस्थेत असून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी उदघाटन केल्यास काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा पावित्रा बदलापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होम प्लॅटफॉर्मची पाहणी

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. त्यानंतर बदलापूर रेल्वे स्टेशन मास्तरांना होम प्लॅटफॉर्मचे उदघाटन रद्द करण्याबाबत निवेदन दिल्याची माहिती बदलापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी दिली.

दरम्यान, येत्या २४ तारखेला खासदार कपिल पाटील हे बदलापुरातील महाविकास आघाडीच्या विरोधाला झुगारून होम प्लॅटफॉर्मच उदघाटन करणार की विरोध लक्ष्यात घेऊन उद्घाटन कार्यक्रम रद्द करणार हे पाहन महत्वपूर्ण ठरणार आहे.

Edited by - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT