बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर एका सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील नागरिकांनी मंगळवारी रेल रोको आंदोलन केलं. यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तब्बल 300 जणांवर गुन्हे दाखल केले.
तसेच आतापर्यंत 28 जणांना अटकही करण्यात आली आहे. रेल रोको आंदोलन, सरकारी कामात अडथळा, दगडफेक आणि दंगल घडविण्याचा प्रयत्न, अशा विविध कलमांतर्गत पोलिसांनी (Police) गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. सध्या शहरात तणावपूर्व शांतता आहे.
कुणाही कायदा हातात घेऊन सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करू नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. दुसरीकडे बदलापूर (Badlapur News) अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय.
दरम्यान, बदलापूर येथील घटनेची पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती, तर आंदोलन चिघळलं नसतं, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. अत्याचाराच्या या घटनेविरोधात मंगळवारी बदलापूरकरांनी संबंधित शाळेबाहेर आंदोलन सुरु केलं होतं. पण दोन तास होऊनही प्रशासनाकडून आंदोलकांसोबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही.
त्यामुळे आंदोलक संतप्त झाले. यातील काही आंदोलकांनी थेट बदलापूर रेल्वे स्थानक गाठत रेल्वे मार्ग रोखला. यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करण्यासाठी सौम्य लाठीमार केला. पण यानंतर आंदोलक आणखीच आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे आंदोलकांना आवरण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिसांची कुमक मागवावी लागली. त्यानंतरही जमाव शांत होत नसल्याने अखेर शाळेबाहेर अश्रुधुराचा वापर करावा लागला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.