Badlapur Protest Saam Digital
मुंबई/पुणे

Badlapur Protest : आरोपीला फाशी द्या, आंदोलक मागणीवर ठाम; गिरीश महाजनांची मध्यस्थी निष्फळ

Girish Mahajan On Badlapur Protest : बदलापूर अत्याचारप्रकरणी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांना सरकारकडून पाठवण्यात आलं होतं. मात्र आंदोलक आरोपीच्या फाशीवर ठाम आहेत.

Sandeep Gawade

बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांना हलगर्जीपणा दाखवल्यामुळे बदलापूरकरांचं रेल्वे स्थानकावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. हजारोच्या संख्येने आंदोलक रेल्वे स्थानकावर जमले असून त्या नराधमाला फाशीच्या शिक्षेवर ठाम आहे. जोपर्यंत त्याला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत स्थानकावरून हटणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे. सरकारकडून मंत्री गिरीश महाजन यांना मध्यस्थीसाठी पाठवण्यात आलं होतं. मात्र त्यांची मध्यस्थीही निष्फळ ठरली आहे.

तब्बल ९ तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकावर आदोलन सुरू आहे. दरम्यान गिरीश महाजन यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या मागण्या मान्य केल्या. मात्र कोणी कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन त्यांनी बदलापूरकरांना केलं होतं. मात्र आंदोलक नराधमाला फाशी देण्यावर ठाम आहेत. महाजनांनी चार तब्बल २ तास आंदोलकांशी चर्चा केली. मात्र आंदोलक मागण्यांवर ठाम असल्यामुळे महाजनांनी आंदोनस्थळावरून काढता पाय घेतला.

बलापूरमध्ये झालेली घटना खूपच गंभीर आहे, आरोपीला कठोरता कठोर शिक्षा केली जाईल. फास्टट्रॅक कोर्टात या प्रकरणाचा खटला चालवला जाईल. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे कुठेतरी आंदोलन राजकीय भावनेतून प्रेरीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशा घटनांमध्ये राजकाण करायचं नसतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

बदलापूर पूर्व भागातील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या २ चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या दोन्ही चिमुकल्या मुली लघुशंकेसाठी गेल्या असताना शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच त्यांच्यावर अत्याचार केले होते. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी सलग दोन दिवस ही घटना घडली होती. पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नव्हतं. त्यामुळे तिच्या आजोबांनी तिला डॉक्टरकडे नेवून वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलं. यातून दुसऱ्या मुलीवरही अत्याचार झालंचं उघड झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

SCROLL FOR NEXT