Maya Blood Bank in Badlapur sealed after FDA cancels its license over illegal blood transfer and safety violations. saam tv
मुंबई/पुणे

तुकाराम मुंढेंची आणखी एक धडाकेबाज कारवाई! प्रसिद्ध ब्लड बँकचा परवाना कायमचा रद्द

Badlapur Maya Blood Bank License Cancellation Reason: बदलापूरमधील माया ब्लड बँकेचा परवाना एफडीएने कायमचा रद्द केला आहे. तपासणी न करता ५० रक्तपिशव्या पाठवल्याच्या गंभीर प्रकरणामुळे ही कारवाई करण्यात आली असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मोठा निर्णय मानला जात आहे.

Mayuresh Kadav

बदलापुर: नियमबाह्य कारभार आणि रक्तचोरीच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या मुंबईतील जे.जे. महानगर रक्तपेढीचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनानं अखेर रद्द केला. या संपूर्ण प्रकरणात बदलापूर येथील माया ब्लड सेंटरचं कनेक्शन समोर आलं होतं. तपासणी न करताच तब्बल 50 रक्तपिशव्या बदलापूरला पाठवल्याचं उघड झाल्यानंतर बदलापुरातील माया ब्लड बँकेचा परवाना कायमचा रद्द करण्यात आलाय.

जून महिन्यात एफडीएने जे.जे. महानगर रक्तपेढीत अचानक तपासणी केली होती. या तपासणीत अधिनियमांचं सर्रास उल्लंघन झाल्याचं समोर आलं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, रक्तपेढीने कोणतीही तपासणी न करताच 50 रक्तपिशव्या बदलापूरच्या माया ब्लड सेंटर येथे हस्तांतरित केल्या होत्या. रक्तपेढीनं बदलापूर कनेक्शनबाबत एफडीएला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र हे स्पष्टीकरण समाधानकारक असल्यानं एफडीएनं थेट रक्तचोरी आणि रुग्णांच्या जिवाशी खेळ असल्याचा ठपका ठेवला.

यापूर्वी एफडीएनं या रक्तपेढीचा परवाना निलंबित केला होता आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून 15 दिवसांची मुदत दिली होती. मात्र, रक्तपेढीकडून बदलापूरला पाठवलेल्या 50 रक्तपिशव्यांबाबत आणि इतर त्रुटींबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा विचार करता हा परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ब्लड बँकेला टाळं लागलंय.

तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरू आहे. दूध, खाण्याचे पदार्थ, औषध गोळ्या या क्षेत्रांमधील भेसळ आणि काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने अत्यंत आक्रमक पावले उचलली आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांवर या धडक मोहिमेअंतर्गत कठोर कारवाई केली जात आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यात गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss: वजन कमी करायचंय? मग सकाळी फक्त हा एक योगा नक्की करा, महिन्याभरात ६ किलो वजन होईल कमी

Weather Update: पुढील १० तासात धुव्वाधार कोसळणार पाऊस; १५ राज्यांना पावसाचा हाय अलर्ट

मुंबई-पुण्यापेक्षा सोलापूर-मुंबई प्रवास सुसाट! 400 किमी प्रवास फक्त एक तासांत

Diabetes : पावसाळ्यात वाढतो मधुमेहाचा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

Maharashtra News Live Update: बीडच्या केज शहरासह परिसरात दमदार पावसाला सुरुवात, शहरातील रस्ते जलमय

SCROLL FOR NEXT