पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

Pune Teacher Arrested For Minor Physical Assault Case: पुण्यातील आंबेगाव परिसरात 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघड. आरोपीला अटक; पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.
Police take accused teacher into custody in Pune minor assault case; investigation underway under POCSO Act.
Police take accused teacher into custody in Pune minor assault case; investigation underway under POCSO Act.saam tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यातील आंबेगाव परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसानी गुन्हा दाखल करत आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आरीफ याकुब सय्यद असे आहे. आरोपी हा एथर अकडमीच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि कॉम्प्युटरचे शिक्षण देत होता. पीडित मुलगी काही वर्षांपासून त्याच्याकडे शिक्षण घेत होती. लहानपणापासून ओळखत असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने मागील काही महिन्यांपासून ऑनलाईन क्लासच्या वेळी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली होती.

मध्यरात्री घरात घुसून अत्याचार

अंदाजे 3 ते 4 आठवड्यांपूर्वी रात्री उशिरापर्यंत क्लास सुरू असल्याने पीडित मुलगी आरोपीच्या घरीच मुक्कामास थांबली होती. मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना स्पर्श करत लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने घरी गेल्यानंतर सुरुवातीला कोणाला काही सांगितले नाही. मात्र तिच्या वागण्यातील बदल पाहून घरच्यांनी विचारपूस केली असता तिने हा सर्व प्रकार आपल्या बहिणीला आणि वडिलांना सांगितला.

Police take accused teacher into custody in Pune minor assault case; investigation underway under POCSO Act.
Cabinet Expansion : फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 'या' मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात खळबळबळ

पीडितेच्या वडिलांनी तात्काळ आंबेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. दरम्यान, हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर संतप्त झालेल्या काही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोपी आरिफ सय्यद याला पकडून बेदम चोप दिला, ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com