Masked youths carrying sickles roam inside a Badlapur housing society at 3:30 AM, captured on CCTV camera. saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Koyta Gang: बदलापूरमध्ये कोयता गँगची दहशत, हातात कोयते, तोंडाला रुमाल, 37 सेकंदाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Badlapur Koyta Gang Viral Video : बदलापूरमध्ये कोयता गँगची दहशत पुन्हा समोर आली आहे. पहाटे ३:३० वाजता हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या चार तरुणांचा ३७ सेकंदांचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Mayuresh Kadav

पहाटे साडे तीनची वेळ. सर्वजण साखरझोपेत असताना जोरजोरात कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज... अन् त्याचवेळी तोंडाला फडकं बांधून हातात कोयते घेऊन फिरणारे चार तरुण... असा ३७ सेकंदांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हा प्रकार उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील वाटू शकतो. मात्र, हा धक्कादायक व्हिडीओ बदलापूरमधील आहे.

पुण्यात कोयता गँगने दहशत माजवलेली असतानाच आता बदलापूरमध्येही अशाच प्रकारची भीतीदायक घटना समोर आली आहे. भरवस्तीत असलेल्या एका सोसायटी परिसरात काही तरुण हातात कोयते घेऊन संशयास्पद हालचाली करताना दिसून आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरवस्तीत गुन्हेगार इतक्या बिनधास्तपणे वावरत असताना बदलापूर पोलिसांची भूमिका काय आहे असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मागच्या काही दिवसांपासून बदलापुरमध्ये सातत्याने गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत.

बदलापूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच एका सोसायटीच्या आवारातील कोयता गँगचा व्हिडीओ समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आणखीनच वाढले आहे. या व्हिडीओबाबत बदलापूर पोलिसांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र, अशा प्रकारे गुन्हेगार राजरोजपणे शहरात वावरत असताना पोलीस कोणतीच भूमिका घेत नसतील तर जाब कुणाकडे विचारायचा असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय. या प्रकारातून बदलापूर पोलिसांचा गुन्हेगारांना कोणताच धाक उरला नाही का? असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केलाय.

दरम्यान कालच झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने बदलापूर हादरले असताना आज पुन्हा कोयता गँग समोर आल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहे. बदलापूरच्या जुवेली गावाजवळ एका बंद कारमध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले होते, यामध्ये महिला आणि पुरुषाची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. या दोघांच्याही अंगावर धारदार शास्त्राचे वार असल्याचे दिसून आले होते. या घटनेला चोवीस तास उलटले नसतानाच आता कोयता गँग समोर आल्याने पोलिसांनी वेळेत यांच्यावर कारवाई करून शहरातील नागरिक भयमुक्त राहावेत, अशी मागणी आता होत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील विविध विषयांवर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात बैठक

Sachin Tendulkar: विमानात रंगला क्रिकेटचा खेळ! सून सानिया चंडोकने सचिनला केलं आउट, साराने पकडला भन्नाट कॅच

KEM Hospital On Sejal Pawar: प्रणित मोरेच्या शोमध्ये नको ते बरळली, आता डॉ. सेजल पवारवर KEM करणार कारवाई

सावधान! चुकूनही खाऊ नका कच्च्या 'या' ४ भाज्या

PM Kisan Yojana: १८ जूनला ₹२००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT