Badlapur Doctor Detained By ATS Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur: बदलापुरात खळबळ! डॉक्टरला ATS नं पकडलं, दहशतवादी संघटनेशी संबंध?

Badlapur Doctor Detained By ATS: बदापुरमधील एका रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरला एटीएसने ताब्यात घेतलं. उत्तर प्रदेश एटीएसने ही कारवाई केली. त्यामुळे बदलापुरमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

मयूरेश कडव, बदलापूर

बदलापूरमधील एका डॉक्टरला एटीएसने ताब्यात घेतलं आहे. या डॉक्टरवर दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएसने बदलापूरमध्ये येऊन या डॉक्टरला ताब्यात घेतलं. बदलापूरमधील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात हा डॉक्टर कार्यरत होता. या घटनेमुळे बदलापूरमध्ये खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसनं बदलापूर शहरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. बंदी घातलेल्या सिमी या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेली व्यक्ती डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे.

ओसामा शेख असं एटीएसने ताब्यात घेतलेल्या डॉक्टरचे नाव आहे. तो बदलापूर पूर्वेकडील एका खासगी रुग्णालयात होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून कार्यरत होता. एटीएसने ओसामा शेखला ताब्यात घेतल्यानंतर त्याला उल्हासनगर न्यायालयात कस्टडीसाठी हजर केले. उत्तर प्रदेश एटीएसने केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आता या डॉक्टरच्या चौकशीनंतरच त्याचा खरंच दहशतवादी संघटनेशी संबंध होता की नाही याची माहिती समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक प्लेन दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

Pune News: पुण्यात पोलिसांची दलित मुलींवर खोलीत घुसून मारहाण; कायद्याचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT