Shiv Sena Mla: शिंदे सेनेच्या आमदाराच्या घरात कोट्यवधींच्या नोटा? नेमका आमदार कोणता?

Shinde Sena MLA Caught in Viral Money Video: ठाकरेसेनेचे अंबादास दानवेंनी कॅशबॉम्ब फोडल्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशात वातावरण तापवलंय. मात्र दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत नेमका कोणता आमदार आहे? आणि त्यांनी किती कोटींची बंडलं नेमकी कुणाला दिली? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Shinde Sena MLA Caught in Viral Money Video
Shinde Sena MLA Mahendra Dalvi seen in viral video surrounded by bundles of cash, triggering a political storm in Maharashtra.saam tv
Published On
Summary
  • अंबादास दानवेंनी शिंदेसेनेच्या आमदारावर कॅशबॉम्ब फोडला.

  • व्हायरल व्हिडीओमध्ये आमदार महेंद्र दळवी असल्याचा दावा.

  • आमदाराच्या घरात कोट्यवधींच्या नोटांचा आरोप.

नोटांची थप्पी, पैसे मोजणारा व्यक्ती आणि व्हिडीओ कॉलवर व्हाईट कॉलर व्यक्ती. होय. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती आहे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी. आता हाच व्हिडीओ ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवेंनी ट्वीट केला आणि थंडीमुळे गारठलेल्या महाराष्ट्राचं वातावरण अचानक तापलं. या प्रकरणाची चौकशी तर करावीच मात्र याप्रकरणी थेट पंतप्रधान मोदींनीच उत्तर द्यावं, अशी मागणी विरोधकांनी केलीय.

दुसरीकडे शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मात्र आपल्या आमदाराला चौकशी आधीच क्लीन चिट देऊन टाकलीय. आता प्रकरण तापत चालल्यानं महेंद्र दळवींनी साम टीव्हीशी बोलताना व्हिडीओ मॉर्फिंगचा दावा करत दानवेंवर पलटवार केलाय. यावर दानवेंनी महेंद्र दळवींचा व्हिडीओ मॉर्फ केला असेल तर गुन्हा दाखल करावा.असं आव्हान दिलंय.

Shinde Sena MLA Caught in Viral Money Video
Maharashtra Politics: मोठा राजकीय भूकंप होणार; शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला, आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

खरं तर राज्यावर 9 लाख 32 हजार कोटींचं कर्ज झालंय. अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेला शेतकरी मदतीकडे डोळे लावून बसलाय. मात्र आमदारांकडच्या पैशांच्या थप्प्या मात्र कमी होताना दिसत नाही. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांचेच असे पैशांच्या थप्पीसोबतचे व्हिडीओ समोर येत असतील तर याचा तपास कोण करणार की नाही. अशा गोष्टी फक्त अधिवेशनापुरत्या मर्यादीत न राहता याच्या मुळाशी जाऊन कठोर कारवाई व्हायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com