Maharashtra Politics: मोठा राजकीय भूकंप होणार; शिववसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला, आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

Shinde Group MLAs Likely to Join BJP: नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. शिंदे सेनेचे २२ आमदार भाजपमध्ये सामील होण्यास असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय अटकळांना सुरुवात झाली आहे.
Shinde Group MLAs Likely to Join BJP
Shiv Sena (Thackeray faction) leader Aaditya Thackeray addressing the media during the Nagpur Winter Session.saam tv
Published On
Summary
  • शिंदे गटातील २२ आमदार भाजपमध्ये जाणार.

  • नागपूर हिवाळी अधिवेशनात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट.

  • सत्ताधाऱ्यांवर ठाकरे गटाकडून जोरदार टीका

शिंदे गटातील २२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केला. आदित्य ठाकरेंच्या दाव्यामुळे राज्यातील राजकरणात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. नागपूर हिवाळी अधिवेशनात पत्रकारांशी ते बोलत होते.

Shinde Group MLAs Likely to Join BJP
Maharashtra Politics:निवडणुकीपुरते वाद नंतर हम साथ-साथ; शिंदे-चव्हाणांसाठी फडणवीसांची 'डिनर डिप्लोमसी'

विरोधी पक्षनेत्याच्या प्रस्तावात कुठलाही बदल झाला नाहीये, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. ही बातमी कुणी पेरलीय, कधी पेरली, कुठच्या माणसाने पेरली हे माहिती आहे. तसेच सत्ताधारी एका पक्षात २ गट पडलेत. त्यापैकी एका गटातील २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेत,ते लवकरची उडी मारणार असल्याचा दावा उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलाय.

Shinde Group MLAs Likely to Join BJP
Maharashtra Politics:निवडणुकीपुरते वाद नंतर हम साथ-साथ; शिंदे-चव्हाणांसाठी फडणवीसांची 'डिनर डिप्लोमसी'

गेल्या वर्षभराचा अभ्यास केला तर त्या आमदारांनी सांगितलेली सगळी कामे झाली आहेत. त्यांना हवा असलेला फंड दिलेला आहे. त्याशिवाय उठ सांगितले तर उठायचे. उडी मार बोलल्यावर उडी मारायची. आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेत. नेमकं कोणी याचा धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरलीय, त्यांना कळेल. या २२ मधील एक जण स्वत:ला व्हाईस कॅप्टन म्हणतो असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

आदित्य ठाकरेंच्या या दाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केलाय. हे सर्व म्हणण्याकरिता असतं. उद्या कोणी हेही म्हणू शकेल की, आदित्य ठाकरेंचे २० आमदार आहेत, तेही भाजपच्या गळ्याला लागलेत, असं कोणाच्या म्हणण्याने होत नाही. आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचंय? असे उत्तर फडणवीस यांनी दिलंय. शिंदेसेना आमचा मित्र पक्ष आहे. ती खरी शिवसेना आहे, त्यामुळे मित्र पक्षाचे आमदार आम्हाला घेऊन अशा प्रकारचं राजकारण करायचं नाही, असं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com