Maharashtra Live News Update: उदगीरमध्ये उभ्या ट्रकला भीषण आग, ट्रकमधील स्वयंपाकाच्या गॅसचा स्फोट

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज बुधवार, दिनांक १० डिसेंबर २०२५, राज्यात कडाक्याची थंडी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन अपडेट, लोकसभा- राज्यसभा, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

उदगीरमध्ये उभ्या ट्रकला भीषण आग, ट्रकमधील स्वयंपाकाच्या गॅसचा स्फोट

लातूरच्या उदगीर बिदर रोडवर रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या मालवाहू ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. ट्रकमधील चालक स्वयंपाक करत असताना गॅसचा स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी नाही ,अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र गाडीतील संपूर्ण माल जळून खाक झाला आहे.

विरार पश्चिममधील आदिनाथ बिल्डिंगच्या संरक्षण भिंतीचा कठडा कोसळला

इमारतीच्या पॅसेजच्या संरक्षण भिंतीचा स्लॅब संरक्षण कठडा खालच्या दुकानावर कोसळला आहे

आज रात्री आठ च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे

या दुर्घटनेत कोणतीही जीवित किंवा जखमी झाला नसल्याची प्राथमिक माहिती आहे

बोलींज पोलीस, वसई विरार महापालिकेचे अग्निशमन जवान घटनास्थळावर दाखल झाले आहेत

कॅन्सर झाला म्हणून कर्मचाऱ्याला कामावरुन काढलं

कर्करोगाच्या उपचारावेळी घेतलेल्या सुट्ट्यांमुळे कामाहून कमी केल्याचा आरोप करीत पुण्यातील एक आयटी कर्मचारी सोमवारपासून कंपनी कार्यालयासमोर उपोषणाला बसला आहे. संतोष पाटोळे गेल्या ८ वर्षांपासून स्लम्बरजर (एसएलबी) या फ्रेंच कंपनीत कामाला होते.

तानाजी सावंत यांच्या मुलाला हवी भाजपची उमेदवारी?

भाजपचाकडे भरून दिला उमेदवारी अर्ज

प्रभाग क्रमांक 38 मधून तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक

गिरीराज सावंत यांच्या संस्थेतील सहकाऱ्यांनी आज भाजप कार्यालयात येऊन गिरीराज सावंत यांचा उमेदवार अर्ज दाखल केला आहे.

पंढरपूर : ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक, उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली

तीन दिवसांपासून पंढरपुरात ऊस दर संघर्ष समितीचे बेमुदत उपोषण

उपोषणकर्ते समाधान फाटे यांची प्रकृती ढासळली

उपचार घेण्यास समाधान फाटे यांचा नकार

उपचार घेण्यासाठी प्रशासनाचा दबाव

उपोषणस्थळी शेतकऱ्यांची गर्दी

Gadchiroli: लैंगिक शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकारी निलंबित; गडचिरोलीतील घटना

लैंगिक शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे

सदर आरोपी वैद्यकीय अधिकारी मुलचेरा विनोद मश्याखेत्री फरार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे

सदर आरोपीला पकडण्यासाठी

पोलिसांचे दोन पथके तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकरण.........

वैद्यकीय अधिकाऱ्याने परिचारिकेला केली लैंगिक सुखाची मागणी केली होती

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या या त्रासामुळे परिचारिकेचा आत्महत्येचा प्रयत्न केला

Tanaji Sawant: तानाजी सावंत यांच्या मुलाला हवी भाजपची उमेदवारी?

भाजपचा कडे भरून दिला उमेदवारी अर्ज

प्रभाग क्रमांक 38 मधून तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक

गिरीराज सावंत यांच्या संस्थेतील सहकाऱ्यांनी आज भाजप कार्यालयात येऊन गिरीराज सावंत यांचा उमेदवार अर्ज दाखल केला आहे.

Pune: लोकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरच्या कार्यालयात वसंत मोरे दाखल

पुण्यात विविध ठिकाणी फ्लॅटचे बुकिंग घेऊन त्यांच्याकडून त्यासाठी लागणारे पैसे उकाळून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत शिवसेनेचे वसंत मोरे यांनी संबंधित बिल्डरच्या कार्यालयावर थेट गराडा घातला.

पुण्यातील एका बिल्डर ने लोकांना फसवून बुकिंग चे पैसे घेतले मात्र फ्लॅट तर काही दिले नाही याची तक्रार काही जणांनी वसंत मोरे यांच्याकडे केली. जिथे बुकिंग केले तिथे या बिल्डर ने लोकांना अक्षरशः हाकलून दिल्याचे आरोप केले आहेत. बुकिंग करणाऱ्या व्यक्तीने 66 लोकांकडून तब्बल 67 लाख रुपये घेतल्याचे आरोप यावेळी करण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांनी थेट बिल्डरचे कार्यालय गाठले. पैसे मागायला गेले की संबंधित बिल्डर हा बाथरूम मध्ये लपतो अशी तक्रार सुद्धा लोकांनी केली. याचा एक अनुभव वसंत मोरे यांना सुद्धा आला...

११,४९७ तक्रारींची नोंद झाली, तपासणी सुरु- मुंबई महानगरपालिका उपायुक्त

११,४९७ तक्रारी नोंद झाले आहे

१०,६६८ तक्रारी कडे असिस्टेंट कमिशनर यांनी तपास केला आहे

जिथे लोक राहतात त्याच ठिकाणी मतदान करायचे असते मात्र अश्या पद्धतीच्या चुका ज्यांच्या काढून झाल्या त्यांना आता एका मतदार यादी मध्ये जोडून एकाच वार्ड मधील नागरिकांनी त्याच वार्ड मध्ये जाऊन मतदान करायचे

ज्या वार्ड मध्ये एकादी व्यक्तीचे नाव रिपीट झाले आहे त्यांनी आता एकच वार्ड मध्ये मतदान करायचे आहे

हा बाबतचे परिपत्रक सादर करायचे होते मात्र त्यात काही त्रुटी आढळून आल्यामुळे

१०० मतदान एका ठिकाणी वरून दुसरी कडे ट्रान्सफर झाले आहे त्यांची चौकशी सुरू आहे

त्यांची तपासणी करून आम्ही काही दिवसात पत्र जारी करू- विश्वास शंकरवार, मुंबई महानगरपालिका उपायुक्त

शालार्थ प्रकरणामुळे १० महिन्यांपासून वेतन बंद झाल्यानं ८ डिसेंबरपासून शिक्षकांचा अन्नत्याग

- सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज तिरडी काढत केला निषेध, अनेकांनी मुंडन करत नोंदवला सरकारचा निषेध..

- शालार्थ घोटाळा अधिकाऱ्यांनी केला असतानाही विनाकारण शिक्षकांचे वेतन १० महिन्यांपासून रोखल्याचा आरोप.

- सर्व शिक्षकांची नियुक्ती शालार्थ आयडी शिक्षण विभागाने नियमानुसार झाली असताना वेतन का रखडले म्हणत सरकारचा नोंदवलं निषेध....

- कोणतीही पूर्वसूचना, परिपत्रक न देता मार्च २०२५ पासून वेतन थांबविले.

- ड्राफ्ट नसल्याचे कारण देत वेतन रोखणे अन्यायकारक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे.

- वेतन नसल्याने शिक्षकांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक स्थिती गंभीर, वेठबिगारीसारखे जीवन.

- उच्च न्यायालयाने वेतन लवकर अदा करण्याचे आदेश दिले तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पुढाकार घेत नाही त्यामुळे केल

Parbhani: परभणीत लॉंग मार्च संघर्ष समिती कडून रास्ता रोको आंदोलन

संविधान विटंबना करणाऱ्या सोपान पवार वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा व दोषी पोलिसांवर ही गुन्हा दाखल करण्याची मागणी

परभणीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान विटंबनेच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे एक वर्षा नंतरही सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना न्याय मिळाला नसल्याचा आरोप करत परभणीत आज लॉंग मार्च संघर्ष समितीतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.संविधानाची विटंबना करणाऱ्या सोपान पवारची नार्को टेस्ट करावी व त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह सह पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात या मागण्यासाठी आज हा रस्ता रोजी करण्यात आला यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी ही केली.दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले..

अमेडीया कंपनीसोबत झालेला व्यवहार रद्द करा- शितल तेजवानी

अमेडीया कंपनीसोबत झालेला व्यवहार रद्द करा शितल तेजवानीची पुणे न्यायालयात धाव.

अमिडीया कंपनीकडून कोणतेही रक्कम आम्हाला मिळाली नाही आणि या सगळ्या प्रकरणात व्यवहार रद्द करावा या मागणीसाठी शितल तेजवानीने पुणे न्यायालय दावा केला दाखल..

शितल तेजवानीने केला पुणे न्यायालयात मुंढवा वतन जमिनीच्या विक्रीचा दावा रद्द करण्यासाठी केला न्यायालयात दाखल...

पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यातील वाद संपुष्टात

नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये जोरदार कुस्ती झाली होती. अवघ्या दहा दिवसानंतर मात्र दोन्ही पक्षांमध्ये दोस्ती पाहायला मिळाली‌. विशेष म्हणजे भाजप उमेदवार मारूती बनकर आणि शिवसेनेचे उमेदवार आनंदा माने यांनी एकत्र येत बिनविरोध उमेदवारांच्या विजयाचा गुलाल उधळला. त्यामुळे सांगोल्यात मागिल काही दिवसांपासून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यात सुरू असलेला वाद ही या निमित्ताने संपुष्टात आला आहे.

Vidhansabha: आरोग्यवर्धिनी योग शिक्षक संघाचा विधानसभेवर मोर्चा

- यशवंत स्टेडियम मधून निघाला मोर्चा...

- योग शिक्षकांचे थकीत मानधन देण्याच्या मागणीसह पुनर्नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी मोर्चा

- आंदोलनात राज्यभरातील योग शिक्षकांचा सहभाग

- मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा आंदोलकांचा इशारा

Chembur: चेंबूर स्टेशनबाहेर बिल्डिंगला आग

सिद्धार्थ रेसिडेन्सी, पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर वेस्ट येथे एका बिल्डिंगला आग

चेंबूर स्टेशनच्या बाजूला आहेच इमारत

नाशिकमध्ये १९ लाखांचा पानमसाला साठा जप्त; FDA ची धडक छापेमारी

- नाशिकमध्ये १९ लाखांचा पानमसाला- साठा जप्त FDA ची धडक छापेमारी, गोडाऊन सील

- जेल रोडवर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा मोठा भंडाफोड, जहांगीर शेखच्या गोडाऊनवर FDA ची कारवाई

Nagpur: समग्र शिक्षा संघर्ष समितीच्यावतीने बेमुदत आमरण उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन

- समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन

- समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचाऱ्याला सरसकट शासनसेवेत समाविष्ट करण्याची संघटनेची मागणी

- तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात दिव्यांग विभागातील निम्म्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट केले मात्र उर्वरित कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नाही घेतले...संघटनेचा आरोप

- आमच्या मागण्या मान्य केल्याची विधानसभेत घोषणा करा, संघटनेची मागणी

- अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलक झाले आक्रमक

राज्यातील साखर कारखान्यांनी दोन हजार कोटी शेतकऱ्यांचे थकवले

राज्यातील साखर कारखान्यांनी दोन हजार कोटी शेतकऱ्यांचे थकवले

शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आक्रमक

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयातील हिरकणी कक्ष कायम बंद

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयातील हिरकणी कक्ष कायम बंद,बाळाला घेऊन येणाऱ्या महिलांची मोठी गैरसोय

फक्त बदनामी करणे हाच काँग्रेसचा धंदा! पुण्यात मतदार यादीत फेरफार केल्याचे आरोप बिनबुडाचे, भाजपचे चोख प्रत्युत्तर

पुणे शहरातील काँग्रेसचे नेते यांनी काल पत्रकार परिषद घेत पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात मतदार यादीत फेरफार भाजप नगरसेवकांकडून होत असल्याचा आरोप करत एक सीसीटीव्ही सुद्धा जाहीर दाखवला. त्यामध्ये भाजपचे दोन नगरसेवक हे क्षेत्रीय कार्यालयात बसून मतदार यादी मध्ये फेरफार करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसने केला. भाजपने दुसऱ्या बाजूला हा सगळा आरोप फेटाळून लावत हे आरोप मुळात बिनबुडाचे आहेत आणि काँग्रेस फक्त भाजपाला बदनाम करण्याच्या उद्देशाने हे सगळं करत असल्याचं मत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केलं आहे.

पुढील पंधरा दिवस कसबा गणपती मंदिर बंद राहणार

पुढील पंधरा दिवस कसबा गणपती मंदिर बंद राहणार

ग्रामदैवत श्री कसबा गणपती मूर्तीवर होणार शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रिया

ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ;

१५ डिसेंबर पासून मंदिर बंद मंदिराच्या उपलब्ध इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच

अंबादास दानवे यांच्या कॅशबॉम्ब प्रकरणात शेकापची उडी

० महेंद्र दळवी यांच्यासह सत्ताधारी आमदारांच्या व्यवहारांची सखोल चौकशी करा

० शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची मागणी

० मंत्री भरत गोगावले यांचाही व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा

नागपुरात पारडी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला

- नागपुरात आज पारडी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला होता त्या बिबट्याचा थरार साम टीव्ही ने दाखवला...

- बिबट असून नर असून चार वर्षाचा आहे, अशी माहिती दिली जात आहे..

राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते यांनी माहिती दिली.

- बिबट्याला रेस्क्यू करून ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर येथे नेण्यात आले.

- बेशुद्ध नंतर 8 ते 9 तास गुंगीचा प्रभाव असतो, त्यामुळे त्याला स्टेबल केले जाते..

- प्राथमिक तपासणीत त्याला दुखापत झाली नासल्याच समोर आले आहे, त्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून पुढील तपासणी केली जाणार आहे..

- त्यानंतर वन विभागाच्या पुढील आदेशानुसार त्याचा अधिवासात सोडण्याचा निर्णय घेतला जाईल.

Pune Live News Update: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट, २ पोलिसांचे निलंबन

येरवडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. १९ मे २०२४ रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात एका भरधाव पोर्शे कार ने २ जणांचा जीव घेतला होता.

भोसरी एमआयडीसी पाठोपाठ, महाळुंगे एमआयडीसीत कामगाराचा मृत्यू

उद्योग नगरी पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक भागात कामगाराचा मृत्यू होण्याच्या घटना सारख्या घडत आहेत. काल सकाळी देखील म्हाळुंगे एमआयडीसी परिसरातील अल्ट्रा कॉर्पोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत मुकेश पटेल या 24 वर्षांचा कामगाराचा मशीन मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

देवाच्या आळंदीत इंद्रायणी नदीमध्ये मृत माशांचा खच, आता माणसं मरायची वाट पाहणार का? ग्रामस्थ संतप्त

राज्यातील लाखो वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असणाऱ्या देवाच्या आळंदीतील इंद्रायणी नदी किती दूषित असते, ही सांगणारी दृश्य आता समोर आली आहेत.

ज्या पवित्र अशा इंद्रायणी नदीच्या पाण्याने वारकरी स्नान करून आचमन करत होते ती नदी आता इतकी जीवघेणी झाली आहे की या पाण्यात मृत माशांचा खच पहायला मिळतोय. आता या दूषित पाण्यानं माणसं मरायची वाट पाहणार का? असा सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून विचारला जातोय. नदीत रसायनयुक्त पाणी सोडण्याचं पाप अनेक कंपन्या करत आहेत. त्यामुळं इंद्रायणी नदी अनेकदा फेसाळते, जीवघेणी होते. वारकऱ्यांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या इंद्रायणीनं मोकळा श्वास घ्यावा म्हणून अनेकदा आंदोलनं छेडली गेली. हे पाहून मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी अनेक आश्वासने ही दिली. मात्र प्रभावी अंमलबजावणी कधीचं झाली नाही, परिणामी आज मृत माशांचा खच पहायला मिळतोय. त्यामुळं आळंदीकर पुन्हा आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत.

उल्हासनगरातील स्मशानभूमीतील धुराने नागरिक हैराण

उल्हासनगर शहरातील स्मशानभूमी नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरू लागल्या आहेत. यातील बहुतांश स्मशानभूमींना चिमण्या नसल्याने मृतदेहाचे दहन करताना निघणारा धूर परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.त्यामुळे या धूराने प्रदूषण होत आहे. स्मशानातील धूर हा हवेबरोबर इतरत्र पसरून आसपासच्या इमारतीत राहणार्‍या नागरिकांच्या घरात जातोय. येणार्‍या धुरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या धुराचे लोट इमारतीत सातत्याने येत असल्याने अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश स्मशानभूमीत चिमण्या बसवेलल्या नाहीत. त्यामुळे धुराची समस्या अधिक तीव्र झाली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या एकूण ४ स्मशानभूमी आहेत. त्यात पारंपरिक पध्दतीने मृतदेहांचे दहन केले जाते. पारंपरिक पद्धतीने स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याने पर्यावरणाचा र्‍हास होतो. शिवाय प्रदूषण होत असते. एका मृतदेहाचे दहन करण्यासाठी साधारण साडेचारशे ते पाचशे किलो लाकडे लागतात.

बाल संगोपन योजनेतील लाभार्थी बालकांना लाडकी बहिण योजनेचा फटका...

अनाथ आणि निराधार बालकांना देखील लाडक्या बहिण योजनेचा फटका बसल्याची माहिती आहे.. अनाथ, निराश्रीत, निराधार, बेघर, एकल पालक अशा शून्य ते 18 वयोगटातील बालकांना संगोपनासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रति महिना 2 हजार 250 रुपये आर्थिक मदत केली जाते.. याचे बुलढाणा जिल्ह्यात 6 हजार 56 लाभार्थी आहे.. तर राज्यात याची संख्या दीड लाखांपर्यंत असू शकते.. मात्र या सर्व अनाथ निराधार बालकांना गेल्या आठ महिन्यापासून आर्थिक लाभ मिळालेला नाही, लाडकी बहीण योजनेचा या सर्व बालकांना फटका बसल्याने एकल पालकांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

उल्हासनगरत सराईत गुंडावर चाकू हल्ला, सीसीटीव्ही आला समोर

उल्हासनगरातील एक सराईत जयकिशन आलमचंदानी याच्यावर भर दुपारी चाकू हल्ला झाला होता , आता या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय, जयकिशने वाद उकरून काढल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे, दुपारी साडेचार वाजता च्या सुमारास जॅकी हा आपल्या दुचाकी ने जात असताना समोरून एका कारने जयकिशनच्या मोटरसायकलला कट मारल्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता , त्यानंतर कारचालक गाडीत बसून परत जात असताना चालक सीटवर असलेल्या इसमाला जयकिशन याने खेचून बाहेर काढलं , त्यानंतर झालेल्या झटापटीत कार मधील एकाने त्याच्या जवळील असलेल्या धारदार शस्त्राने जय किशन वर हल्ला केला यात जय किशन गंभीर जखमी झाला असून त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, प्राथमिक उपचारानंतर त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत

छत्तीसगडच्या पोलीस वाहनाला भरधाव ट्रकची भंडाऱ्यात भीषण धडक

छत्तीसगड पोलिसांच्या स्कार्पिओ वाहनाला पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने भंडाऱ्याच्या पिंपळगाव सडक इथं जबर धडक दिली. या अपघातात नागपूरकडे जाणारे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यावानात महिला पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्यासोबत दोन पोलीस कर्मचारी होते तेही यात जखमी झाले आहे. हा संपूर्ण अपघात राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. हे पोलीस कर्मचारी डोंगरगड इथं दाखल असलेल्या एका पोक्सो गुन्हाच्या तपासाकरिता नागपूरकडे जात असताना हा अपघात घडला.

राष्ट्रवादीने भाजपला कोल्हापूर महानगरपालिकेत जास्त जागा सोडाव्यात - भाजपची मागणी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महापालिका निवडणुकीत देखील भाजप, अजित पवार राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाची महायुती पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने कागल इथं राष्ट्रवादीसाठी एकही उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीने देखील कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागा द्याव्यात अशी मागणी आता थेट भाजपने केली आहे. महापालिका निवडणुकी संदर्भात महायुतीमध्ये अद्याप कोणताही फॉर्मुला ठरला नसून केवळ भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील आणि शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांच्यात प्राथमिक बैठक झालेली आहे. जागा वाटपाचा अंतिम निर्णय हा महायुतीतील प्रमुख नेते घेणार आहेत. असेही भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Maharashtra : राष्ट्रवादीने भाजपला कोल्हापूर महानगरपालिकेत जास्त जागा सोडाव्यात - भाजपची मागणी

नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने कागल इथं राष्ट्रवादीसाठी एकही उमेदवार उभा केला नाही.

त्यामुळे आता राष्ट्रवादीने देखील कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागा द्याव्यात अशी मागणी आता थेट भाजपने केली आहे.

Pune : शितल तेजवानी भोगणार १४ दिवसांची पोलिस कोठडी?

शितल तेजवानीच्या ताब्याची पिंपरी चिंचवड पोलिसांना पहावी लागणार वाट

पुणे पोलिस उद्या तेजवानी ची पोलिस कोठडी वाढून मिळावी यासाठी करणार न्यायालयाला विनंती

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी सर्व दस्त तेजवानी ने सुपूर्द केल्यावर दस्ताची होणार तपासणी

उद्या न्यायालयाला पुणे पोलिस आणखी ६ दिवसांची पोलिस कोठडी मागणार

Pune : मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या दोघांना तुरुंगवास ऐवजी समाजसेवा करण्याची शिक्षा

मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या दोघांना तुरुंगवास ऐवजी न्यायालयाने समाजसेवा करण्याची सुनावली शिक्षा

पुणे न्यायालयाने दिलेल्या या निकालाची सर्वत्र चर्चा

दोन आरोपींना चार दिवस दररोज तीन तास समाजसेवा करण्याचे आदेश

पोलिसांच्या देखरेखीखाली समाजसेवा करण्याचे आदेश

वाहतूक पोलिसांना मदत करणे, पोलिस ठाण्यातील स्वच्छता करणे यासह नागरी कर्तव्ये पार पाडणे अशी शिक्षेची तरतूद

Pandharpur : वाळू माफियांकडून दलित तरूणास लोखंडी राॅडने मारहाण

करमाळा तालुक्यातील कंदर येथील एका दलित तरूणास वाळू माफीयांनी लोखंडी रॉडने मारहाण केली आहे

या मारहाणी मध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अकलूज येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड

पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल ची तोडफोड

पुण्यातील हडपसर मध्ये असलेल्या सह्याद्री हॉस्पिटल ची तोडफोड

रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप

हॉस्पिटल च्या हलगर्जीपणा केल्यामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप

Maharashtra : गडचिरोली येथे विशेष अभियानात सहभागी असलेल्या जवानांचा सत्कार

गडचिरोली पोलिस मुख्यालय येथे रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विशेष नक्षली अभियानामध्ये सहभाग असलेल्या C-60 विभागाचा अधिकाऱ्यांचा तसेच जवानांचा प्रशस्त्रीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

maharashtra : 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न

31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्याचा पूर्ण प्रयत्न.. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला

आता गडचिरोली कॉनफ्लेक्ट एरियातून डेव्हलप एरिया कडे जात आहे

गडचिरोली जिल्ह्यात कमिशनर असताना पाहिजे तशी सुविधा नव्हती

आत्ता प्रत्येक नक्षलग्रस्त भागात आऊट पोस्ट काढण्यात पोलीस विभागाला यश आलेले आहे

बस शिक्षण अशामुळे नक्षलवाद कमी होण्यामध्ये खूप मदत झालेली आहे

Pune : भाजपचा क्षेत्रीय कार्यालयात घुसून मतदार याद्यांमध्ये फेरफार 

पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने भाजपवर गंभीर आरोपांची मालिकाच सुरू केलीय.

भवानी पेठ येथील महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात भाजप कार्यकर्ते बंद खोलीत तब्बल ४.३० तास बसून मतदार याद्यांमध्ये फेरफार करत असल्याचे काँग्रेस नेते संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आणि याचे पुरावे सुद्धा दिले.

Maharashtra : 11 नक्षल्यांचे जिल्ह्यात आत्मसमर्पण

जानेवारी 2024 मध्ये नक्षल्यांची संख्या 100 होती

आता फक्त 11 नक्षल जिल्ह्यात शिल्लक

तातडीने सर्व नक्षल्यांनी मुख्य प्रवाहात यावे असे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या आवाहन

Nagpur : नागपूरमध्ये बिबट्याचा हल्ल्यात सात जण जखमी

आज झालेल्या बिबट्याचा हल्ल्यात सात जण जखमी झालेले आहे.

त्यापैकी पाच ते सहा जणांना नागपुरातील पारडी शिवारात असलेल्या भवानी धर्मादाय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..

Pandharpur: पंढरपुरमध्ये वाळू माफियांकडून वकिलावर जीवघेणा हल्ला, पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू 

पंढरपूर -

वाळू माफियांकडून वकिलावर जीवघेणा हल्ला

सोलापूर जिल्हातील माढा तालुक्यातील गणपती अकोले गावातील घटना

अॅड.पाडुरंग कुबेर तोडकर असं हल्ला झालेल्या वकिलाचे नाव आहे.

हल्यात गंभीर जखमी झालेल्या वकिलावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु.

Pune: मतदार यादीतील फेरफार आणि घोळ, पुण्यात मनसे आक्रमक 

मतदार यादीतील फेरफार आणि घोळ

याबाबत मनसे पदाधिकारी आज खडक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार

निवडणुकांच्या तोंडावर मतदार यादीतील घोळाचा व्हिडिओ बॉम्ब

काल महा विकास आघाडीच्या वतीने ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती

आज मनसे आक्रमक

Buldhana: पीकविमान देण्याची मागणी, शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण

बुलडाणा -

मागील वर्षीचा पिक विमा देण्याची मागणी .

संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

मागील चार दिवसांपासून सुरू आहे उपोषण

Nandurbar: ६ दिवसांत सारंखेडाच्या घोडेबाजारात ३१५ घोड्यांची विक्री

नंदुरबार -

६ दिवसांत सारंखेडा च्या घोडेबाजारात ३१५ घोड्यांची विक्री

तीनशे पंधरा घोड्यांच्या विक्रीतून एक कोटी ५४ लाखांची उलाढाल

चेतक फेस्टिवल मध्ये आज पासून अश्व नृत्य स्पर्धा

आज पासून पुढच्या दहा दिवसात होणाऱ्या विविध स्पर्धांमुळे खरेदीत येणार तेजी

Pune:  पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर २२,८०९ हरकतींपैकी तब्बल ३० टक्के हरकतींसोबत खोटी कागदपत्रे

पुणे -

पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या २२,८०९ हरकतींपैकी तब्बल ३० टक्के हरकतींसोबत खोटी कागदपत्रे

३० टक्के हरकतींसोबत जोडली खोटी कागदपत्र, पालिकेच्या पडताळणीत माहिती समोर

आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, वीजबिले यांसह एआयद्वारे बनावट तयार केलेल्या प्रती अनेकांनी सादर

मोठ्या प्रमाणात फेरफार आढळल्याने संबंधित हरकतींची दखल घ्यायची की नाही, यावर निवडणूक विभाग संभ्रमात

पुराव्यांची सखोल शहानिशा करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश

Pune: प्रवाशांसाठी दिलासा! पुण्यात रद्द आणि विलंब होणाऱ्या विमानांची संख्या घटली

पुणे -

प्रवाशांसाठी दिलासा! पुण्यात रद्द आणि विलंब होणाऱ्या विमानांची संख्या घटली

पुणे विमानतळावरील उड्डाणे सुरळीत होण्याच्या मार्गावर

गेल्या आठवडाभरात सातत्याने विमानांचे रद्द होणारे उड्डाण आणि विलंबामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना आता दिलासा

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण रद्द होणारी आणि उशिराने उड्डाण करणारी विमानांची संख्या घटली

Pune: विद्यार्थ्यांना दिलासा!  शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास अंतिम मुदतवाढ

पुणे-

शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास अंतिम मुदतवाढ

२२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास येत्या सोमवारपर्यंत मुदतवाढ

या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळांना शाळा नोंदणी आणि नियमित शुल्कासह विद्यार्थी नोंदणीसाठी ही अंतिम मुदतवाढ

Pimpari Chinchwad: पिंपरी -चिंचवडमध्ये तापमानाचा पारा घसरला, शहरात पहाटे दाट धुक्याची चादर

पिंपरी चिंचवड -

पिंपरी चिंचवड शहरात थंडीची चाहूल वाढलेली आहे

आज सकाळी पिंपरी चिंचवड शहरात १०डिग्री सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.

तापमान झपाट्याने खाली गेल्याने शहरावर दात धुक्याची चादर पसरली होती.

Latur: महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत गोंधळ, 900 जणांचा आक्षेप

लातूर -

लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 18 प्रभागातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्यात

दरम्यान या यादीत गोंधळ असल्याचा आक्षेप नोंदवला आहे

अनेक प्रभागात दुबार नावे, अनेकांची प्रभाग वगळून इतर प्रभागात नावे या सर्व आक्षेपावर आता महानगरपालिका 200 कर्मचाऱ्यासह कामाला लागली आहे.

प्रारूप मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी महानगरपालिका कामाला लागल्याचे पाहायला मिळतं आहे.

Sawantwadi: सावंतवाडीत महसूल विभागाची मोठी कारवाई, अवैध वाळू वाहतूक करणारे ६ डंपर जप्त

सावंतवाडीत महसूलच्या भरारी पथकाची मोठी कारवाई

अवैध वाळू वाहतूक करणारे ६ डंपर जप्त

या कारवाईत सहाही वाहने जप्त करण्यात आली आहेत.

बांदा वेत्ये येथे मुंबई गोवा महामार्गावर वाळूने भरलेले ५ डंपर ताब्यात घेण्यात आले.

तर कोलगाव येथे एक डंपर ताब्यात घेण्यात आला.

सावंतवाडी तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.

यामुळे वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

Dharashiv: मंडळ अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी तुळजापूरच्या तहसीलदाराविरोधात गुन्हा

धाराशिव -

मंडळ अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी तुळजापूरच्या तहसीलदारावर गुन्हा दाखल

क्रेडिट कार्ड वरून घेतलेल्या कर्जाचे हप्ते का भरले नाहीत म्हणून तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी केली मंडळ अधिकाऱ्याला शिवीगाळ

मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल यांच्या फिर्यादीवरून तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या वरती धाराशिव च्या आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मंडळ अधिकाऱ्यांनी क्रेडिट कार्डवर घेतलेले कर्ज न फेडल्याने बँकेचे तहसीलदारांना फोन,यातून शिवीगाळ केल्याची माहिती

Dhule: धुळ्यात थंडीचा कहर, तापमानाचा पारा ६ अंशावर घसरला 

धुळे -

धुळ्यात थंडीचा कहर

आज धुळ्यामध्ये सहा अंशावर तापमानाचा पारा घसरला

वाढत्या थंडीचा परिणाम सकाळी घराबाहेर पडणार्‍या नागरिकांवर आणि शाळकरी विद्यार्थ्यांवर

Pune: पुरंदर विमानतळाबाबत मुख्यमंत्री लवकरच शेतकऱ्यांशी बैठक घेण्याची शक्यता

पुणे -

पुरंदर विमानतळाबाबत मुख्यमंत्री लवकरच शेतकऱ्यांशी बैठक घेण्याची शक्यता

पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत राज्य शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार असल्याची माहिती

जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादनासाठी जमीनदर व मोबदला निश्चितीसंदर्भात बैठक

बैठकीत शेतकऱ्यांनी जमीनदर, मोबदला, आयकर सवलत, पुनर्वसन, नोकरी, वाढीव एफएसआय, सुविधा विकास आदी अनेक मागण्या मांडल्या

Raigad: आंबादास दानवे यांच्याविरोधात रायगडमध्ये गुन्हा दाखल होणार

आंबादास दानवे यांच्याविरोधात रायगडमध्ये गुन्हा दाखल होणार

शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी दिली माहिती

शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्याबाबतची चुकीची व्हिडीओ क्लिप प्रसार माध्यमांसमोर आणली

या व्हिडीओद्वारे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न दानवे यांनी केला असल्याचा आरोप

Pune: पुणे विमानतळावर २.२९ करोड रुपयांचा गांजा जप्त

पुणे -

पुणे विमानतळावर २.२९ करोड रुपयांचा गांजा जप्त

प्रवाशाच्या बॅग मध्ये मिळून आला २ किलो गांजा

बँकॉक वरून परतणाऱ्या प्रवाशाकडे मिळून आलं अमली पदार्थ

पुण्याच्या एअर इंटेलिजन्स युनिट ची कारवाई

एअर इंटेलिजन्स युनिट कडून एका प्रवाशाला अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com