Badlapur Palika School : बदलापूर नगरपालिकेच्या सर्व शाळांना ISO मानांकन; विद्यार्थ्यांना दिले जातं डिजिटल शिक्षण

Badlapur News : काळाची गरज लक्षात घेऊन बदलापूर नगरपालिकेनं सर्व शाळांमध्ये बदल घडवून आणले. मुलांना डिजिटल शिक्षण दिलं जातं. अद्ययावत सोयीसुविधा आणि ISO मानांकनासाठी लागणारे सर्व निकष या शाळांनी पूर्ण केले
Badlapur Palika School
Badlapur Palika SchoolSaam tv
Published On

मयुरेश कडव 
बदलापूर
: बदलापूर नगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशित शिक्षकांना डिजिटल शिक्षण दिले जात आहे. या शाळांमधील असलेल्या सुविधा लक्षात घेता पालिकेच्या सर्वच्या सर्व २० शाळांना ISO मानांकन मिळाले आहे. या सर्व शाळांमध्ये डिजिटल शिक्षण दिलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या वर्षी सर्व शाळांमध्ये प्रवेश फुल झाले आहेत. आता आयएसओ मानांकन मिळाल्यामुळे नगरपालिकेच्या सर्व शाळांना मानांकन मिळाल्याची हि पहिलीच वेळ आहे. 

मराठी माध्यमांच्या शाळांकडे विशेष करून सरकारी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलापूर नगरपालिकेनं पूर्णपणे बदलून टाकला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा वाढता प्रभाव आणि काळाची गरज लक्षात घेऊन बदलापूर नगरपालिकेनं आपल्या सर्व शाळांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. या शाळांमध्ये मुलांना डिजिटल स्वरूपात शिक्षण दिलं जातं. अद्ययावत सोयीसुविधा आणि ISO मानांकनासाठी लागणारे सर्व निकष या शाळांनी पूर्ण केले आहेत. 

Badlapur Palika School
Dhule Zp School : शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा; जिल्हा परिषदेची शाळा भरतेय कुडाच्या झोपडीत

या निकषांची केली पूर्तता 
बदलापूर नगरपालिकेच्या एकूण २० शाळा आहेत. या सर्व शाळांना आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी कुंपण, सुसज्ज ग्राउंड, झी टीव्ही यंत्रणा, विद्यार्थ्यांसाठी अध्ययावत आसन व्यवस्था, स्वच्छता, प्रशिक्षित शिक्षक, डिजिटल शिक्षण असे निकष ठेवण्यात आले होते. नगरपालिकेच्या शाळा असूनही पालिकेचा शिक्षण विभाग मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांच्या प्रयत्नातून सर्व शाळांनी हे निकष पूर्ण केले.

Badlapur Palika School
Shirpur News : मोबाईल पाहताना चुकून फाइलवर झाले क्लीक; पुढे जे घडले ते भयंकर, तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

शाळा क्रमांक एकला पहिला पुरस्कार 

गांधी चौकातील शाळा क्रमांक १ ची केंद्राच्या पीएमश्री मध्ये म्हणजेच प्रधानमंत्री स्कूल फॉर राइजिंग इंडियासाठी निवड झाली आहे. या शाळेला जिल्हास्तरावरील ११ लाखांचा पहिला पुरस्कार देखील मिळाला आहे. महत्त्वाचं म्हणजे कुळगाव, गांधी चौकातील शाळा क्रमांक 1 ही ठाणे जिल्ह्यातील पहिली डिजिटल आणि पहिली आयएसओ मानांकन प्राप्त शाळा होण्याचा मानही या शाळेने पटकावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com