Leoprad : नागपूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, अनेकांवर केला हल्ला, वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु | VIDEO

Nagpur leopard attack rescue operation update : नागपूरच्या पारडी परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घालत अनेकांवर हल्ला केला आहे. वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Nagpur Leopard News : नागपुरातील पारडी शिवरामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातला आहे. 2 दिवसांपूर्वी कापसी भागामध्ये बिबट्या दिसून आला होता. त्याच बिबट्यानं आज पहाटे अनेक लोकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून. नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. लवकरच बिबट्याला पकडण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

पारडीमध्ये आज पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात दोन ते तीन जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भरवस्तीत अचानक बिबट्या आढळून आल्याने पारडीत भीतीचे वातावरण आहे. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त (Nagpur Leoprad Rescue Operation) तैनात करण्यात आला आहे. वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे. सोबतच परिसरात बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com