बदलापुरमधील शाळेत २ चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूर बंदची हाक देत आंदोलन करण्यात आले आहे. संतप्त झालेल्या बदलापूरमधील नागरिकांनी रेलरोको केला आहे. बदलापूर रेल्वेस्थानकावर सकाळपासून नागरिकांनी रेलरोको आंदोलन करत एकही लोकल जाऊन दिली नाही. मोठ्यासंख्येने बदलापुरकर रेल्वेरुळावर उतरले आहेत. बदलापुरच्या या घटनेमुळे मध्य रेलवेची वाहतूक कोलमडली आहे. लोकलसेवेसोबत अनेक लांबपल्ल्याच्या रेल्वेला याचा फटका बसला आहे. कोणकोणत्या रेल्वे गाडयांची वाहतूक वळवण्यात आली हे आपण जाणून घेणार आहोत...
बदलापुरच्या घटनेनंतर करण्यात आलेल्या रेलरोकोमुळे आतापर्यंत १० मेल एक्सप्रेस गाड्या कर्जत-पनवेल-ठाणे स्थानकावरून वळवण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते अंबरनाथ दरम्यान लोकलसेवा सुरळीत सुरू आहेत. पण बदलापूर ते कर्जत लोकलसेवा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. या आंदोलनानंतर बदलापूर ते कर्जत दरम्यान एकही लोकल धावली नाही. सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी लोकल वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. लोकलसेवा उशिराने सुरू आहे.
22159 - सीएसएमटी - चेन्नई एक्स्प्रेस
11019 - कोनार्क एक्स्प्रेस
22732 - हैदराबाद एक्स्प्रेस
22497 - तिरुचिरापल्ली हमसफर एक्स्प्रेस
19667 - एमवायएस हमसफर एक्स्प्रेस
11029 - कोयना एक्स्प्रेस
22160 - डॉ. एमजीआर चेन्नई सेंट्रल- सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
22731 - हैदराबाद- मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
22226 - सोलापूर- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस
14805 - यशवंतपुर - बाडमेर वातानुकूलित एक्स्प्रेस
11014 - कोईम्बतूर - मुंबई एलटीटी एक्स्प्रेस
12164 - चेन्नई सेंट्रल - मुंबई एलटीटी एक्स्प्रेस
12263 - हजरत निजामुद्दीन एसी दुरांतो एक्स्प्रेस
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.