दादारमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दादर रेल्वे स्थानकात ट्रेन अडवण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर चर्चगेटवरून विरारकडे जाणारी ट्रेन थांबवली आहे.
तलाठी भरतीविरोधात काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेत अशा पद्धतीने रेल रोको करण्यात आली आहे. तलाठी भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोपी युवक काँग्रेसने केला आहे. या प्रकरणाची सखोल एसआयटी चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे.
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेवर चढून, रुळावर उतरुन रेलरोको केला आहे. पोलिसांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समजूत काढणाचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते आंदोलनावर ठाम आहेत. या आंदोलनामुळे दादर रेल्वे स्थानकात एकच गोंधळ निर्माण झालाय.
आंदोलन शांत करण्यासाठी पोलिसांह आरपीएफ जवान रेल्वे स्थानकात दाखल झाले आहेत. तसेच सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय. आंदोलकांना ताब्यात घेऊन चर्चगेटवरून विरारकडे जाणारी ट्रेन देखील सोडण्यात आली आहे. या घटनेमुळे नागरिकांचा मोठा खोळंबा झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.