Akshay Shinde Encounter Saam Digital
मुंबई/पुणे

Akshay Shinde Case: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांचे पाय खोलात, कोर्टाने झाप झाप झापलं; सुनावणीत काय घडलं?

Priya More

Badlapur Crime Case Updates in Marathi: बदलापूरमधील दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी सोमवारी एन्काऊंटर केला. यावर आक्षेप घेत त्याच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली. याप्रकरणावर आज सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान हायकोर्टाने पोलिसांवर चांगलेच ताशेरे ओढले. 'चार पोलिस असताना आरोपी कसा काय आक्रमक होऊ शकला?', असा सवाल कोर्टाने उपस्थित केला. तसंच, 'पिस्तूल चालवायला ताकद लागते. साधा माणूस ते चालवू शकत नाही. याला एन्काऊंटर म्हणू शकत नाही. तातडीने अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेज सादर करा.', असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित केले. या सुनावणीदरम्यान कोर्टाने ठाणे पोलिसांच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित केले. 'चार पोलिस अधिकारी असताना आरोपी कसा काय आक्रमक होऊ शकला? ज्या पोलिस अधिकाऱ्याने गोळी मारली त्याने कमरेच्या खाली गोळी ‌मारली पाहिजे होती?, कितीच्या बँचचे ते‌ पोलिस अधिकारी आहेत?, १९९२ च्या पोलिस बँचचे अधिकारी आहेत का?' असे प्रश्न कोर्टाने उपस्थित केले

कोर्टानं पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, 'आजच जखमी पोलिस अधिकाऱ्याच्या हाताच्या पंज्याचे नमूने घ्या. तुम्ही फायर करताना पायावर, हातावर केलं पाहिजे होते. हे एन्काऊंटर म्हणता येणार नाही.' तसंच, 'आरोपीवर हल्ल्याप्रकरणी एफआयआर कधी झाला?, घटनेचं ठिकाण तुम्ही पुराव्यासाठी सील केलं होतं का?, आरोपीनं पिस्तुल वापरलं की रिव्हॉल्वर?' असे प्रश्न उपस्थित केले. यावर सरकारी वकिलांनी पिस्तुल वापरली असल्याचे कोर्टाला सांगितले. तर कोर्टाने पुढे पिस्तुल लोडेड होती का? मग आरोपीनं ते‌ कसं काय वापरली.' असा प्रश्न विचारला यावर उत्तर देताना वकिलांनी पिस्तुल लॉक नव्हतं असं सांगितले.

सरकारी वकिलांच्या उत्तरानंतर कोर्टाने सांगितले की, 'तुम्ही जे सांगताय ते सत्य मानायला कठीण आहे. साधा माणूस पिस्तुल वापरु शकत नाही. त्याला ताकद लागते' असे म्हणत पिस्तुल लॉक का ‌नव्हतं? जर एखादा आरोपीला असं घेऊन जाता तर इतका निष्काळजीपणा का?', असा सवाल कोर्टाने यावेळी केला. पिस्तुलवर आरोपीच्या हाताच्या खुना असायला पाहिजेत. याबाबतचा अहवाल पुढच्या सुनावणीत सादर करा.', असे कोर्टाने सांगितले.

तसंच, आरोपीने तीन बुलेट झाडल्या होत्या. एक पोलिसाला लागली तर दुसऱ्या दोन बुलेट कुठे आहेत.' असा प्रश्न कोर्टाने केला. यावर उत्तर देताना सरकारी वकिलांनी सांगितले की, 'पोलिस अधिकाऱ्याला मांडीला ‌जखम झाली आहे.' कोर्टाने सरकारी वकिलांना आणखी एक प्रश्न केला की, ही घटना रहिवासी भागात घडली होती का? यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ' मुंब्रा भागात घडली. एका बाजूला रहिवाशी भाग आहे दुसरीकडे‌ टेकडी आहे.' तसंच, आरोपीला बुरखा घालता होता का? यावर सरकारी वकिलांनी नाही असे उत्तर दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourist Place : डोळ्यांचं पारणं फेडणारा अद्भुत असा कोकण दिवा किल्ला!

Marathi News Live Updates: रायगडमध्ये धबधब्याच्या प्रवाहातून वाहून एक युवती मृत्यू

PM Modi Pune Tour : पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; वाहतुकीत मोठा बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर, वाचा

Heavy Rain In Pune: पुण्यात पावसाची धुवाँधार बॅटिंग; अवघ्या ३ तासात १२४ मिलिमीटर पाऊस, रस्त्यांना नदीचं स्वरूप, सोसायटीमध्ये शिरलं पाणी

laxman hake : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्यानतंर लक्ष्मण हाकेंनी सोडलं उपोषण, VIDEO

SCROLL FOR NEXT