Akshay Shinde: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? ७ तास चाललेल्या पोस्टमॉर्टममधून सत्य आलं बाहेर

Akshay Shinde Post Mortem Report: अक्षय शिंदेचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट आलाय. यातून अनेक प्रश्नाची उत्तर मिळालीत. मात्र विरोधकांनी आणि अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी आरोपांची झडी लावलीय. त्याच दरम्यान अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेत पोलीस संरक्षणाची मागणी केलीय.
Akshay Shinde: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? ७ तास चाललेल्या पोस्टमॉर्टममधून सत्य आलं बाहेर
Akshay Shinde Post Mortem ReportOutlook
Published On

सचिन गाड, साम प्रतिनिधी

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली. पोलिसांच्या या कारवाईवर अनेकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत पोलिसांच्या कारवाईवर शंका उपस्थित केलीय. तर संपूर्ण बदलापूर प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्यात येणार आहे. याच दरम्यान अक्षय शिंदेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय. दुसरीकडे अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत संरक्षणाची मागणी केलीय.

जवळपास ७ तास पोस्ट मॉर्टम चालू होतं, या अनेक खुलासे करण्यात आलेत. तसेच अक्षयचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती उघड झालीय. मात्र गुन्हा सिद्ध झाला नाही, प्रकरण दाबण्यासाठी अक्षयला मारलं, असा आरोप अक्षय शिंदेची आई आणि त्याच्या कुटुंबीयांनी केलाय. अक्षयचा मृतदेह कळवा येथील रुग्णालयात ठेवण्यात आलाय.

अक्षय शिंदेच्या वडिलांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव

उच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेत अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचा दावा करण्यात आलाय. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी चौकशीची मागणी केलीय. अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरचे राजकीय लाभार्थी कोण? असा सवाल या याचिकेच्या माध्यमातून गंभीर सवाल करण्यात आलाय. तसेच अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरसह चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचाराची देखील नव्याने चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीय.

Akshay Shinde: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? ७ तास चाललेल्या पोस्टमॉर्टममधून सत्य आलं बाहेर
Akshay Shinde Encounter: बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट? शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी, चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा आरोप

काय आहे रिपोर्ट

अक्षय शिंदेचा पोस्ट मॉर्टम करण्यास ७ तास लागलेत. या अहवालात अनेक प्रश्नांची उत्तर देण्यात आली आहेत. संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आलीय. पाच डॉक्टरच्या पॅनलने पोस्ट मॉर्टम केलं. अक्षयचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यांच उत्तर या अहवालात देण्यात आलाय. मृत्यू अती रक्तस्त्रावाने झाल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्याच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलाय.

Akshay Shinde: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? ७ तास चाललेल्या पोस्टमॉर्टममधून सत्य आलं बाहेर
Akshay Shinde Encounter: बदलापूर प्रकरपणातील आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण? वाचा

पोलिसांच्या कारवाईवर अनेक उपस्थित होत आहेत. अक्षय शिंदे याला जेलमधून न्यायालयात नेणे आवश्यक होते, पण त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात आले?

पोलिसांची रिव्हॉल्वर लॉक असते. आरोपीच्या तोंडावर काळ्या कपड्याचा मास्क होता. त्यातून त्याला पोलिसांच्या खिशातील रिव्हॉल्वर कशी दिसली? जर अक्षय शिंदे याने रिव्हॉल्वर हिसकावून घेतले, त्यावेळी पोलीस काय करत होते. अक्षय शिंदेच्या हातात बेड्या नव्हत्या का?

रिव्हॉल्वर लॉक होते तर ते आरोपी अक्षय शिंदेला उघडता कसे आले ?

आरोपी अक्षय शिंदेसोबत गाडीत पाच ते सहा पोलीस होते. तरीही अक्षय शिंदेने रिव्हॉल्वर कसं हिसकावलं?

गाडीत पाच-सहा पोलिसांसोबत असताना आरोपी अक्षय शिंदेला जीवघेणा हल्ला करणं कसे शक्य झालं?

अक्षय शिंदे याला चौकशीसाठी घेऊन जाताना बेड्या घातल्या नव्हत्या का ?

संबंधित शाळेच्या संस्थाचालकांना अद्याप पोलिसांनी अटक का केली नाही?

दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुनावणी जलदगतीनं होणार होती, त्याचं काय झालं?

अक्षय शिंदेला पोलिस कोठडीत मारहाण केल्याचा आरोप आई-वडिलांनी केला होता, यात किती तथ्य आहे?

संस्थाचालकांना वाचवण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com