Akshay Shinde Encounter: बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट? शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी, चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा आरोप

Akshay Shinde Encounter: बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं संपूर्ण तपास तातडीनं सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली गेली. आरोपी विशेष समितीपुढे गेला तर प्रकरण वेगळ्याच वळणार जाईल, या भीतीनं त्याचा एन्काऊंटर झाल्याचा दावा एका याचिकेतून करण्यात आलाय.
Akshay Shinde Encounter: बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट? शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी, चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा आरोप
Akshay ShindeSaam Tv
Published On

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या चकमकीला वेगळ वळणं लागण्याची शक्यता आहे. बदलापूर अत्याचार घटनेचा गुन्हा नोंद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाला होता. या शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली गेली.

सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार आहे. सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीय.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाला. तळोजा तुरुंगातून बदलापूरला ट्रन्सिट रिमांडवर नेत असतांना अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आत्मरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात अक्षयचा मृ्त्यू झाला. मात्र अक्षयच्या कुटुंबियांनी पोलिसांनी हेतुपूरस्क अक्षयचा एन्काऊंटर केल्याचा आरोप केला. कोणीतरी पोलिसांना त्याला मारण्यासाठी पैसे दिल्याचा आरोपही अक्षयच्या कुटुंबियांनी केलाय.

चकमकीमागील सत्य समोर आलं पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. अक्षयच्या कुटुबियांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यापासून नकरा दिलाय. आता थोडया वेळात मुंब्रा पोलीस अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागृहात ठेवणार आहेत. कुटुंबीय स्वीकारेपर्यंत मृतदेह शवगृहात ठेवला जाण्याची शक्यता आहे.

अक्षय शिंदेची चकमक बनावट असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलाय. त्याचवेळी या प्रकरणात नवा खुलासा झालाय. ज्या शाळेत अक्षय शिंदे सफाई कर्मचारी होता, त्या शाळेचा ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. बदलापूर घटनेचा गुन्हा नोंद झाल्याच्या दुस-याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची त्याच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं संपूर्ण तपास तातडीनं सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी आता केली जात आहे. याप्रकरणी आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलीय लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.

दरम्यान उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत अजून मोठे खुलासे करण्यात आलेत. अक्षय शिंदेनं पोलिसांकडे मीरा बोरवणकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचा याचिकेतून दावा करण्यात आलाय. आरोपी हायकोर्टानं स्थापन केलेल्या विशेष समितीपुढे गेला तर प्रकरण वेगळ्याच वळणार जाईल, या भीतीनं त्याचा एन्काऊंटर झाल्याचा याचिकेतून गंभीर आरोप करण्यात येत आहे. तसेच ट्रस्टी आणि शाळेतून सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारी अद्याप फरार असल्यानं ठाणे पोलीस आणि एसआयटीच्या कारभारावर सवाल उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com