Arvind Kejriwals : अरविंद केजरीवालांना दुसरा धक्का; वकिलांच्या भेटीबाबतची याचिका फेटाळली

Delhi Rouse Avenue Court : त्यांची ही दुसरी याचिका देखील दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने काल केजरिवालांच्या अटकेच्या समर्थनार्थ पहिली याचिका देखील फेटाळलीये.
Delhi Rouse Avenue Court
Arvind KejriwalSaam Tv
Published On

Delhi News :

कथित दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना गेल्या २४ तासांत दिल्ली उच्च न्यायालयाने दुसरा झटका दिला आहे. वकिलांना आठवड्यातून पाच वेळा भेटता यावे यासाठी केजरीवाल यांनी याचिका दाखल केली होती. त्यांची ही दुसरी याचिका देखील दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने काल केजरिवालांच्या अटकेच्या समर्थनार्थ पहिली याचिका देखील फेटाळलीये.

Delhi Rouse Avenue Court
Dhule Crime : जनावरांच्या चाऱ्यात लपवून दारूची तस्करी; पोलिसांकडून पर्दाफाश, लाखोंचा साठा जप्त

केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी युक्तीवाद करताना म्हटलं की, "अरविंद केजरीवाल यांच्यावर ३० ते ४० खटले प्रलंबित आहे. या सर्व खटल्यांची माहिती समजून घेण्यासाठी त्यावर आभ्यास करण्यासाठी आठवड्यातील फक्त एक तास पुरेसा नाही. वकिलांसाठी वेळ वाढवून मागणे हा सर्वात मुलभूत कायदेशीर अधिकार आहे. त्या अंतर्गतच केजरीवाल यांनी वकिलांशी आठवड्यातून ५ वेळा बैठक करता यावी अशी मागणी केली आहे."

युक्तीवाद करताना जैन यांनी संजय सिंह यांचाही उल्लेख केला. संजय सिंह यांच्यावर फक्त ५ ठिकाणी विविध ८ गुन्हे दाखल होते. त्यावेळी वकीलंसोबत तीन बैठका घेण्यास त्यांना परवानगी देण्यात आली होती.

यावर ईडीकडून असलेल्या वकीलांनी युक्तीवाद करताना म्हटलं की, केजरीवालांनी ५ कायदेशीर बैठकीची मागणी केली आहे. मात्र सध्या ते तुरुंगात आहेत. अन्य बाहेरील व्यक्तींच्या तुलनेत त्यांना तुरूंगातील नियमांचे पालन करून वागणूक दिली जाते. या आधीच त्यांना एका आठवड्यात २ बैठका घेण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र या कायदेशीर बैठकांचा सल्लामसलत व्यक्तीरीक्त अन्य राजकीय कामांसाठी वापर केला जात आहे, असं म्हटलंय.

Delhi Rouse Avenue Court
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांचा मुक्काम तुरुंगातच, दिल्ल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com