Baba Siddique Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

Baba Siddique Killed Case Update: बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपी लीलावती रुग्णालयामध्ये गेला होता. जवळपास अर्धा तास तो रुग्णालयामध्ये होता अशी धक्कदायक माहिती समोर आली आहे.

Priya More

Baba Siddique Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीने पोलिस चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपी लीलावती रुग्णालयामध्ये गेला होता. जवळपास अर्धा तास तो रुग्णालयामध्ये होता. बाबा सिद्दिकी यांच्या वाचण्याची शक्यता कमी असल्याचे कळताच तो रुग्णालयातून बाहेर पडला आणि पळून पुण्याला गेला.

मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार गौतम हा बाबा सिद्दिकी यांचे निधन झाल्याची खात्री करण्यासाठी लीलावती रुग्णालयात गेला होता. जवळपास ३० मिनिटं शिवकुमार गौतम लीलावती रुग्णालयाजवळच होता. बाबा सिद्दिकी यांची तब्बेत अत्यंत चिंताजनक असून वाचण्याची शक्यता धूसर असल्याची खात्री पटल्यानंतरच शिवकुमार तिथून निघून गेला. त्यानंतर रिक्षाने तो कुर्ल्याला गेला तिथून ठाण्याला लोकलने गेला आणि ठाण्यावरून एक्स्प्रेसने पुण्याला रवाना झाला.

मोबाईलवर बातम्यांमधून शिवकुमारला बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूची बातमी समजली. गोळीबारानंतर शिवकुमारने शर्ट बदली केला आणि घटनास्थळी देखील तो जवळपास २० मिनिटं तमाशा बघत होता. प्लॅनिंगनुसार शिवकुमार हा धर्मराज कश्यप आणि गुरमैल सिंह या दोन शूटरला उज्जैन रेल्वे स्थानकात भेटणार होता. ज्याठिकाणी बिश्नोई गँगमधील माणसं त्यांना वैष्णव देवीला नेणार होते. मात्र दोघेही घटनास्थळी पकडले गेले होते. रविवारी यूपी एसटीएफच्या मदतीने उत्तर प्रदेशच्या बेहराईचवरून त्याला अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT