Baba Siddique Case: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; मुंबई गुन्हे शाखेने फरार शूटरच्या मुसक्या आवळल्या; शिव कुमारला युपीतून अटक
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठ यश मिळालं आहे. फरार शूटरला अखेर अटक करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. फरार शूटर शिव कुमारला उत्तर प्रदेशातील बेहराईचमधून अटक करण्यात आलीय. अटकेची ही कारवाई मुंबई गुन्हे शाखा आणि उत्तर प्रदेश STF नी संयुक्तपणे केलीय.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. मुंबई गुन्हे शाखेने यूपी एसटीएफच्या पथकासह संयुक्त कारवाई करत उत्तर प्रदेशातील बहराइचमधून आरोपी शिवा कुमारला अटक केलीय. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इतर शूटरनुसार, शिवा कुमारने १२ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईतील वांद्रे भागात बाबा सिद्दीकीवर गोळीबार केला होता. शिव कुमार हा उत्तर प्रदेशातून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या प्लान करत होता. त्याचदरम्यान मुंबई क्राइम ब्रांच आणि युपीच्या एसटीएफने त्याला अटक केलीय.
अटक केलेल्या इतर शूटरने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार त्यांनी बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्याआधी मिरची पूड स्प्रे सिद्धिकींच्या चेहऱ्यावर फेकणार होते आणि त्यानंतर गोळीबार करणार होते. परंतु शिव कुमारने दिसताच तसं न करता गोळीबार केला. त्यानंतर इतरही मारेकऱ्यांनीही गोळ्या झाडल्या.
दरम्यान यूपी एसटीएफसोबत मुंबई क्राइम ब्रँचच्या एका पथकात सहा अधिकारी आणि १५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शूटर शिवा कुमारसह उत्तर प्रदेशातील इतर दोन आरोपींना अटक केली. आरोपींना मुंबईत आणण्यात येत आहे. या कारवाईत एसटीएफच्या पथकाचे नेतृत्व परमेश कुमार शुक्ला यांनी केले. या पथकात उपनिरीक्षक जावेद आलम सिद्दीकी यांचाही सहभाग होता.
शिव कुमारला नेपाळमध्ये पळून जाण्यासाठी काही लोकांनी मदत केली होती. त्यांनाही पोलिसांनी शिव कुमारसह अटक केलीय. अनुराग कश्यप, ज्ञान प्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव, आणि अखिलेंद्रे प्रताप सिंह अशी या लोकांची नावे आहेत. शिव कुमारच्या अटकेतून या हत्येप्रकरणातील अजून नवीन माहिती समोर येतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय.
बाबा सिद्दिकी यांची दसऱ्याच्या दिसऱ्या दिवशी संध्याकाळी तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्या प्रकरणाची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली होती. त्याची पोस्ट पुण्यात राहणाऱ्या शुभम लोणकर नावाच्या तरुणाच्या फेसबूक अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस शुभम लोणकरचा शोध घेत होते. पण त्याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.