Aayush Komkar Case Saam Tv
मुंबई/पुणे

Vanraj Andekar: आंदेकरच्या अडचणीत वाढ, कुटुंबाविरोधात दुसरा गुन्हा; जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, बँक अकाउंट सील

Aayush Komkar Case: आयुष कोमकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आंदोकर कुटुंबीयांवर पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केला. आंदेकरांच्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसंच बँक अकाऊंट सील करण्यात आले आहेत.

Priya More

पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.आंदेकर कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आंदेकरवर पुण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली आंदेकरसह १२ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी सोनाली आंदेकरला ताब्यात घेण्यासाठी गुरूवारी पोलिस गेले होते. त्यावेळी पोलिसाच्या सरकारी कामात अडथळा करून सोनाली आंदेकरीला ताब्यात घेण्यास विरोध करणाऱ्या १२ जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या सर्वजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी तक्रार दाखल करत थेट सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा सोनाली आंदेकर आणि तिच्या इतर सहकाऱ्यांविरोधात दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.

बंडू आंदेकरच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. जेलमध्ये असतानाही बंडू आंदेकरच्या नावावर जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुरूवारी पुणे पोलिसांनी आंदेकरच्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली.या प्रकरणी सात जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर सहकुटुंबाच्या बँक अकाउंट सील करून आर्थिक नाड्या आवळल्या आहेत.

यातील आरोपी सुटण्यासाठी कुठलाही आर्थिक व्यवहार करता येऊ नये यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. बंडू आंदेकर, वनराज आंदेकर आणि त्यांच्या पत्नीच्या काही बँक अकाउंटमध्ये असणारे सर्व लॉकर सील करण्यात आले आहेत. आयुष कुमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. संपूर्ण आंदेकर कुटुंबच सध्या जेलमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai–Nanded Weekly Special Trains: सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई–नांदेड दरम्यान ४ विशेष गाड्या सुरू

पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात मोठा राडा; वकील आणि IPS महिला अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल

Kalyan Traffic : कल्याण पोलिसांचा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय; नवरात्रौत्सव काळात जड वाहनांना बंदी

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी ५ जणांना पोलीस कोठडी

Maharashtra Investment : राज्यात ८०,९६२ कोटींची गुंतवणूक; ४०,३०० रोजगार निर्मिती होणार, कोणत्या जिल्ह्यांना थेट फायदा?

SCROLL FOR NEXT