
पुण्यात १९ वर्षीय आयुष कोमकरवर बेसमेंटमध्ये गोळीबार.
वनराज आंदेकर हत्येतील आरोपी गणेश कोमकरचा मुलाची हत्या.
दोन अज्ञात व्यक्तींनी ३ गोळ्या झाडून केली हत्या.
पुणे पोलिस अॅक्शन मोडमध्ये, ६ पथकं आरोपींच्या शोधात.
गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यामध्ये रक्तरंजित थरार रंगला. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यात आला. वनराज आंदेलकर यांची हत्या करणाऱ्या आरोपी गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. १९ वर्षीय आयुष कोमकरवर दोघांनी अंदाधुंद गोळीबार केला. ३ गोळ्या लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या आयुषचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
पुण्याचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषद घेत आयुष कोमकर हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट दिली आहे. निखिल पिंगळे म्हणाले की, 'आयुष गणेश कोमकर असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. आयुष क्लासवरून घरी येत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार दोन अज्ञात व्यक्तींनी आयुषवर हल्ला केल्याची शक्यता आहे. आयुष हा वनराज आंदेकर हत्येतील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे.आयुष हा वनराज आंदेकरचा भाचा होता.'
आयुष कोमकरच्या आरोपींना सोडणार नाही असा इशारा पोलिस उपायुक्तांना दिला. 'आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेच्या ६ पथकं तैनात करण्यात आली आहेत. आयुष हा क्लासवरून घरी येताना ही घटना घडली. त्याच्या घराखाली बेसमेंटमध्ये हा प्रकार घडला. वनराज आंदेकर यांची झालेली हत्या आणि आताच्या घटनेचा काही संबंध आहे का? या दृष्टीने देखील तपास सुरू आहे. या घटनेत ज्याचा सहभाग असेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याला सोडला जाणार नाही.', असे पोलिस उपायुक्तांनी सांगितले.
पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पुण्यातील गुन्हेगारांना इशारा दिला. 'आयुष कोमकर प्रकरणात कुणीही जबाबदार असला तरी त्याला सोडणार नाही. मृताला न्याय देणं आमचे काम आहे. आता चुकीला माफी नाही, कोणताही गुन्हा करताना १०० वेळा विचार करा.', असा इशारा निखिल पिंगळे यांनी आरोपींना दिला आहे. सध्या पुणे पोलिस आयुष कोमकर हत्या प्रकरणात अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.