Pune Crime अश्विनी जाधव-केदारी
मुंबई/पुणे

एकतर्फी प्रेमातून आधी तरुणीवर हल्ला, मग स्वत: केले विष प्राशन

आता तर त्या मुलानेच विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे: एकतर्फी प्रेमातून हल्ला करण्याचे प्रकरण काल पुण्यामध्ये घडले आहे. आता तर त्या मुलानेच विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलीला मारल्यानंतर हा मुलगा देखील आज आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. काल पुण्यातील वडगाव शेरी येथील इनामदार शाळेत इयत्ता दहावीच्‍या विद्यार्थिनीवर (student) एका माथेफिरू तरुणाने वर्गात घुसून चाकूने (knife) सपासप वार केले आहेत. यात इयत्ता दहावीमध्ये शिकणारी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. शाळेत (school) घुसून वर्गात जाऊन एका विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

सकाळी 11 वाजता ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुरू होता, आरोपी तरुण हातात चाकू घेऊन विद्यार्थिनीच्या दहावीच्या वर्गात घुसला. आरोपीने इतर विद्यार्थ्यांच्या समोर आणि शिक्षिकेच्या समोरच या मुलीवर सपासप वार केले आहेत. त्यामुळे इतर विद्यार्थिनीमध्ये मोठी घबराट पसरली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थिनीला एका पालकांच्या मदतीने तातडीने वडगाव शेरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आरोपी तरुण दहावीच्या मुलीवर वार केल्यानंतर तेथून पसार झाला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पालक मोठ्या संख्येने जमले आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे. एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT