प्रवीण दरेकर यांच्याविरोधात बोगस मजूर प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल

राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीमध्ये आता चांगलीच वाढ होताना दिसत आहे.
Praveen Darekar News
Praveen Darekar NewsSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई: राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या अडचणीमध्ये आता चांगलीच वाढ होताना दिसत आहे. प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक (Mumbai Bank) निवडणुकीकरिता मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अगोदर देखील दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्या प्रकरणी आम आदमी पक्षाने आक्षेप घेत पोलिसामध्ये तक्रार केली होती. यानंतर आता प्रवीण दरेकर यांच्या मुंबईमधील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणी २ महिन्याअगोदर आम आदमी (Aam Aadmi Party) पक्षाने तक्रार केली होती. माता रमाबाई आंबेडकर पोलीस (Police) ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर (Praveen Darekar) याना अपात्र घोषित केले होते. यानंतर त्यांचा जबाब ही पोलिसांनी (Police) नोंदवला आहे. तसेच सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊन देखील पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. याविषयी आम आदमी पक्षाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून सतत पाठपुरावा केला आहे.

शेवट आम्ही जनआंदोलन करण्याची तयारी सुरु केली. तेव्हा आज २ महिन्यांनी मुंबई बँकेच्या बोगस आणि बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला असे आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी यावेळी सांगितले होते. प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक निवडणुकीकरिता मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला होता. या अगोदर देखील दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. आता देखील त्यांनी प्रतिज्ञा मंजूर संस्थेमार्फत मुंबै बँक निवडणुकीकरिता अर्ज भरला आहे.

Praveen Darekar News
पोटच्या लेकांनी जन्मदात्या आईला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत दिल्या नरक यातना

मात्र, दरेकर मजुर नसल्याचा आक्षेप घेत त्यांच्याविरोधामध्ये तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये दरेकर यांना सहकार विभागाने नोटीस बजावली होती. या नोटिशीमध्ये आपण मजूर आहात की नाही? अशी विचारणा दरेकर यांना करण्यात आली होती. तसेच दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख रुपये असल्याचे दाखवले होते. दुसरीकडे, विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना २ लाख ५० हजार मानधन मिळत आहे. यामुळे आपण प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नसल्याचे त्यांनी नोटिशीमध्ये नमुद करण्यात आले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com