Navi Mumbai News
नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानक परिसरात आज सकाळी १५ फूट लांब अजगर आढळून आला. त्यामुळे लोकल पकडण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची काहीवेळ घाबरगुंडी उडाली. काही नागरिकांनी प्राणीमित्र संघटनेला फोन करून याची माहिती दिली. त्यांनतर सर्पमित्र स्टेशनवर दाखल झाले आणि त्यांनी अजगराला पकडून सुरक्षितस्थळी सोडून दिलं. दरम्यान हा अजगर पाहण्यासाठी प्रवाशांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.
काही दिवसांपूर्वी दादरमधील महात्मा गांधी स्वीमिंग पूलमध्ये मगरीचं पिल्लू आढळल्यामुळे गोंधळ उडाला होता. ही घटना ताजी असताना जुईनगर स्टेशन परिसरात अजगर सापडल्यामुळे शहरात भीतीच वातावरण पसरलं आहे.
महापालिकेच्या स्वीमिंग पूलमध्ये पहाटेच्या सुमारास २ फूट लांब मगरीचं पिल्लू पोहताना आढळून आलं होतं. त्यांनतर तज्ज्ञाच्या मदतीने मगरीच्या पिल्लाला सुखरून पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं. त्यांनतर याची बरीच चर्चाही झाली. दरम्यान शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असे हिंस्र सरपटणारे प्राणी आढळत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.