Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाचा विधानसभा अध्यक्षांना दणका; ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Political News: सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना खडसावल्यानंतर ठाकरे गटाकडून माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.
Uddhav Thackeray Group Reaction on Supreme Court Comment assembly speaker rahul narvekar Maharashtra Politics
Uddhav Thackeray Group Reaction on Supreme Court Comment assembly speaker rahul narvekar Maharashtra Politics Saam TV
Published On

Maharashtra Political News

आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात दाखल केली. या याचिकांवर सुनावणी घेताना कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना चांगलंच खडसावलं आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray Group Reaction on Supreme Court Comment assembly speaker rahul narvekar Maharashtra Politics
MLA Disqualification Case: सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलं; सुनावणीत आज काय झालं?

विधानसभा अध्यक्षांनी दिलेले वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयाला मान्य नसल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच मंगळवारपर्यंत सुधारित वेळापत्रक द्या, नाहीतर दोन महिन्यात आम्ही निर्णय घेण्याचे निर्देश देऊ, असंही कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सांगितलं आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांना खडसावल्यानंतर ठाकरे गटाकडून माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.

आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीबाबत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना स्पष्ट निर्देश देत रिजनेबल टाईम दिला होता. पण गेल्या सहा महिन्यात अध्यक्षांकडून याच्यात फक्त चालढकल होत आहेत. वेळेचा दुरुपयोग केला जात आहे, असं ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) नेते अनिल परब यांनी म्हटलं आहे.

मागच्या वेळी कोर्टाने अध्यक्षांना आमदार अपात्रतेचं वेळापत्रक द्यायला सांगितलं होतं, त्या वेळेपत्रकावर आज आमच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला आहे, त्यामुळे कोर्टाने विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेलं वेळापत्रक अमान्य केलं आहे, असंही अनिल परब म्हणाले आहेत.

विधानसभा अध्यक्ष जाणून बुजून या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला विलंब करीत आहेत, हे आमच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनात आणून दिलं आहे. त्यावरती कोर्टाने नाराजी व्यक्त करत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडसावलं आहे. त्यामुळे आता तरी राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाच्या कारवाईला वेग द्यावा, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray Group Reaction on Supreme Court Comment assembly speaker rahul narvekar Maharashtra Politics
Ujjwal Nikam News: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उज्ज्वल निकम यांचं मोठं भाकित, नेमकं काय घडणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com