उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादीतून बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. आपणच खरी राष्ट्रवादी असा दावा करत अजित पवार यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू असून निवडणूक आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचचं लक्ष लागून आहे. (Latest Marathi News)
अशातच ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत एक मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे जी सुनावणी सुरू आहे, तिला सुप्रीम कोर्ट स्थगिती देऊ शकतं, असं उज्ज्वल निकम मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे.
शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे जी सुनावणी सुरू होती, त्याला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिली नव्हती. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीला कोर्ट स्थगिती देऊ शकतं, असं भाकित देखील उज्ज्वल निकम यांनी केलं आहे. दरम्यान, कोर्टाने जर निवडणूक आयोगात सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या सुनावणीला स्थगिती दिली. तर शरद पवार यांना हा मोठा दिलासा असेल.
कारण, जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेचा निर्णय देणार नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी नाव आणि पक्षचिन्ह हे शरद पवार यांच्याकडे राहू शकतं. अजित पवार (Ajit Pawar) गटाने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे, त यावर बोलताना ॲड. उज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे. या दोन्ही याचिकेवरील सुप्रीम कोर्टाने काय निर्णय देतं? यावरुन पुढची दिशा ठरेल, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
दरम्यान, शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा दावा अजित पवार गटाने निवडणूक आयोगात केला आहे. शरद पवार यांच्याकडून पक्षात मनमानी केली जाते. असेही अजित पवार गटानं म्हटलं आहे. दुसरीकडे विधीमंडळ बहुमत आणि संसदीय बहुमत आमच्याकडे आहे, असं शरद पवार गटाने म्हटलं आहे.
आमच्या पक्षामध्ये कुठेही फूट नाही. एक गट बाहेर पडला. मूळ पक्ष आमच्याकडे आहे, असा दावा शरद पवार गटाने केला आहे. कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत चिन्ह गोठवू नका. निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा, अशी विनंती शरद पवार गटानं केली.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.